Thursday, March 5, 2026
Home मराठी ‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क’, लाल साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य; फोटोमधील लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क’, लाल साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य; फोटोमधील लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी आणि खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूला तिच्या रिंकू या नावापेक्षा आर्ची या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली. तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील खूप मोठी आहे. त्यामुळे तिचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशातच रिंकूचा सर्वाना वेड लावेल असा एक फोटो शेअर केला आहे.

रिंकू राजगुरूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकू पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच मॅचिंग असा डिझाइनचा ब्लाउज घातला आहे. यावर तिने मिसमॅच अशी हिरव्या रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. तसेच कानात मोठे इअर रिंग्स आणि टिकली लावली आहे. केसांमध्ये माळलेल्या गजऱ्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. एकंदरीत या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. (rinku rajguru share her saree look photo on social media )

हे मनमोहक फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “ये लाल इश्क, ये मलाल इश्क, ये ऐब इश्क, ये बैर इश्क.” तसेच या फोटोवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यँत ४७ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. या आधी देखील तिच्या फोटोला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दर्शवला आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिझनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

-बक्कळ रक्कमेच्या मोहात न पडता ‘या’ कलाकारांनी ‘बिग बॉस’साठी दिला स्पष्ट नकार; सलमानच्या अभिनेत्रीचाही आहे समावेश

-सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अभिनेता बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड ऍंम्बेसेडर; रशियात करणार टीम इंडियाचे नेतृत्व

हे देखील वाचा