Monday, September 28, 2026
Home › बॉलीवूड › अजय देवगणने अगदी खास अंदाजात दिल्या काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला, ‘तू खूप स्पेशल आहेस…’

अजय देवगणने अगदी खास अंदाजात दिल्या काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला, ‘तू खूप स्पेशल आहेस…’

काल (६ ऑगस्ट) अभिनेत्री काजोलने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला आहे. बॉलिवूडच्या या बबली गर्लने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. काजोल मागील २९ वर्षांपासून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज काजोलच्या वाढदिवसाच्या दिवसही फॅन्ससोबतच संपूर्ण सिनेसृष्टीदेखील काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तिला दिलेल्या या शुभेच्छांमध्ये सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले ते अजय देवगणच्या शुभेच्छांनी.

अजयने त्याच्या हटके आणि खास अंदाजमध्ये काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये काजोल अजयच्या खांद्यावर डोके ठेऊन जोरात हसताना दिसत आहे. अजयने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “तू माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. तू खूप स्पेशल आहेस आणि मी तुझा वाढदिवस खास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल.”

अजयची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली असून, अनेक फॅन्सने त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांची जोडी अशीच कायम हसत खेळत राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी काजोलला नशीबवान म्हटले आहे, कारण तिच्याकडे अजयसारखा नवरा आहे. अजय आणि काजोलची जोडी फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. टॉपच्या जोड्यांमध्ये या दोघांची जोडी गणली जाते.

चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोलने १९९९ साली महाराष्ट्रीयन पद्धतीने खासगी सोहळ्यात लग्न केले. आज या दोघांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग ही दोन मुलं आहेत. लग्नानंतरही काजोलने अनेक हिट सिनेमे दिले. तिच्या आयुष्यातील सर्वात हिट सिनेमा म्हणून ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ओळखला जातो.

काजोलने अवघ्या १६ व्या वर्षी ‘बेखुदी’ या चित्रपटातुन तिचा अभिनयाचा प्रवास सुरु केला. पाहिलाच सिनेमा फ्लॉप झाला तरी काजोलने हार न मानता, नव्या जोमाने आणि आत्मविश्वासने काम मिळवले. तिच्या दुसरा सिनेमा ‘बाजीगर’ने तिला रातोरात स्टार बनवले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा