Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते!’, राखी सावंतने केले ‘न्यूडिटी’वर भाषण, व्हिडिओ झाला व्हायरल

‘एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते!’, राखी सावंतने केले ‘न्यूडिटी’वर भाषण, व्हिडिओ झाला व्हायरल

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत ही मनोरंजनाचा फुल तडका आहे. जिथे कुठे जाईल तिथे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच की काय तिला बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ असे संबोधतात. आजकाल तर ती नेहमीच रस्त्यावर, कॉफी शॉपमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट होत असते. ती दिसताच प्रेक्षक तसेच पॅपराजी आपसूकच तिच्याकडे आकर्षित होतात. ती देखील कधीच चाहत्यांना आणि पॅपराजींना नाराज करत नाही. नेहमीच त्यांच्या प्रश्नांची ती उत्तरं देत असते. अशातच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वतः किती सोज्वळ आहे हे सांगत आहे. तिने कितीही फॅशन केली, तरी ती तिची मर्यादा ओलांडत नाही, असे तिने सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “मी देखील मुलगी आहे, मी देखील ग्लॅमरस कपडे घालते, पण न्यूडिटी कधीच नाही करत. मी देखील फॅशनसोबत चालते, पण न्यूडिटी कधीच करत नाही. कारण माझे माझ्या माणसांवर प्रेम आहे. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. मला माझ्या भारतातील सगळ्या मुलींचा तसेच भारताचा आदर आहे, जय हिंद.”

या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावर उभी राहिलेली दिसत आहे. यामध्ये तिने निऑन कलरचा टॉप आणि शॉर्ट्स घातले आहे. या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. सगळेजण कमेंट करून तिला ट्रोल करत आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “बघा कोण बोलतंय.” (rakhi sawant speak about nudity, video viral on social media )

राखीने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तसेच ती ‘बिग बॉस’नंतर खूप चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे ‘ड्रीम में एन्ट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा