Sunday, June 22, 2025
Home अन्य स्टार बनलेल्या सहदेव दिरडोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स

स्टार बनलेल्या सहदेव दिरडोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स

‘बचपन का प्यार’ गाण्यामुळे सोशल मीडिया स्टार बनलेला सहदेव दिरडो सध्या चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्याचे पहिले अधिकृत गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यानंतर तर त्याच्या प्रसिद्धीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. हे गाणे रॅपर बादशाहने बनवले आहे. तसेच हे नवीन गाणे हितेनने संगीतबद्ध केले आहे, तर याचे बोल बादशाहने लिहिले आहेत. या गाण्यात स्टार सहदेवही दिसत आहे. मात्र, गाण्यातील त्याची शैली वेगळी आहे. हेच नेटकऱ्यांना आवडले नसल्याचे दिसत आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली असून त्याच्यावरील मीम्स जबरदस्त व्हायरल होत आहेत. काही लोकांनी असेही म्हटले आहे की, या मुलाला वाटत असेल की, नक्की मी असे काय केले की, मला हे सर्व करावे लागत आहे.

सहदवेवर बनलेले मीम्स-
एका मीममध्ये भिडे मास्तरचा समावेश असून त्यात म्हटले आहे की, “आमच्या काळात ‘बचपन का प्यार’ होत होता.”

दुसऱ्या एका मीममध्ये म्हटले आहे की, “इतका आनंद मला आजपर्यंत झाला नाही.”

यानंतर आणखी एका मीममध्ये असे म्हटले आहे की, “इतके नावही बनवायला नव्हतं पाहिजे.”

मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सहदेव ‘बचपन का प्यार’ गाणे गाताना दिसत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, सहदेवने सन २०१९ मध्ये आपल्या शाळेत हे गाणे गायले होते. तसेच हा व्हिडिओ त्याच्या शिक्षकांनी बनवला होता.

“तू खूपच पुढे जात आहे,” असेही एका मीममध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे सहदेव सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’च्या मंचावरही पोहोचला होता. सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर ‘इंडियन आयडल १२’मधील सर्व स्पर्धकांनी परफॉर्मन्सही केला होता. (Bachpan Ka Pyar Boy Sahdev Dirdo Viral Song Funny Memes Viral )

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या गाण्यावर अनेक रील्सही बनले आहेत.

सोशल मीडियावर सहदेवचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर माध्यमांमध्येही सहदेवच्या बातम्या चर्चेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा