Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड आमिर काढत होता कियाराचा अडकलेला मास्क; पण नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल, म्हणाले…

आमिर काढत होता कियाराचा अडकलेला मास्क; पण नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल, म्हणाले…

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानचा मागील काही दिवसांपूर्वीच पत्नी किरण राव सोबत घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाबद्दल खूप चर्चा झाली होती. अनेकांनी आमिर आणि किरणचे हे वेगळेपण नाकारले होते, पण हे सर्व असूनही आमिर आणि किरण अनेक प्रसंगी एकत्र दिसले होते. अशातच आता आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर आणि कियारा आडवाणी दिसत आहेत. यादरम्यान कियाराच्या कानात मास्क अडकलेला दिसत आहे. कियारा खूप प्रयत्न करते, पण मास्क काढू शकत नाही. त्यानंतर आमिर येतो आणि कियाराला खूप काळजीपूर्वक मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही मास्क उतरता येत नाही. म्हणून मग कियारा परत मास्क लावण्याचा प्रयत्न करत होती. पण शेवटी तिचा प्रयत्न संपतो आणि मास्क निघतो.

https://www.instagram.com/p/CSe0j98KWSs/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री कियारा आडवाणी आणि आमिर खानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, “कदाचित लवकरच कियारा आमिर खान होईल.” तसेच दुसऱ्या युजरने लिहिले की, “दुसरे लग्न करण्याचा विचार करत नाही ना.” आणखी एका युजरने लिहिले की, “आता तुम्हाला यासोबत लग्न (निकाह) वाचावे लागेल.”

कियाराची कामगिरी
कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर कियारा आडवाणीचा ‘शेरशाह’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीझ झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा देखील ​​आहे. तो शहीद कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारत आहे, तर कियारा त्याची मैत्रीण डिंपल चीमाची भूमिका साकारत आहे. याशिवाय कियारा आडवाणी ‘जुग जुग जिओ’, ‘भूल भुलैया 2’ आणि ‘मिस्टर लेले’ मध्येही दिसणार आहे.

आमिरचा आगामी चित्रपट
त्याचबरोबर आमिरने त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. करीना कपूर या चित्रपटात आमिरच्या विरुद्ध दिसणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा अधिकृत रिमेक आहे, ज्यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ गेल्या वर्षी रिलीझ होणार होता, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलावा लागला होता. आता तो या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा