Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड कधी लंच तर कधी डिनर, एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम घालवताना दिसतायेत ‘पॉवर-कपल’ प्रियांका अन् निक

कधी लंच तर कधी डिनर, एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम घालवताना दिसतायेत ‘पॉवर-कपल’ प्रियांका अन् निक

गेल्या अनेक दिवसांपासून ‘पॉवर-कपल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिले जात आहे. कारण पॉप-स्टार निक सध्या लंडनमध्ये प्रियांका चोप्रासोबत आहे. नुकचेत त्यांना शहरातील एक प्रसिद्ध कसिनोमधून बाहेर येताना पाहिले गेले.

निक आणि प्रियांकाने लंडनमध्ये त्यांच्या चाहत्यांसोबत फोटोसाठी पोझ देखील दिल्या. पांढरे स्कर्ट आणि ब्लाउजमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर निकने जांभळा बॉम्बर जॅकेट आणि बेज पँट घातली आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये निक आणि प्रियंका एकदम कूल आउटफिट परिधान करून पावसात बाहेर पडताना पाहिले गेले.

प्रियांका आणि निक लंडनमधील नाईट्सब्रिजमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसून आले होते. दोघे ही एकमेकांना साजेसे दिसत होते.

निक आणि प्रियांकाने लंडनमध्ये एका चाहत्यासोबत सेल्फीसाठी पोझ दिली होती. या फोटोमध्ये हे जोडपे एकमेकांचा हात धरून जाताना दिसून आले आहेत.

प्रियांका सध्या लंडनमध्ये रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिने निक लंडनला आल्यावर त्याच्यासोबतची एक सेल्फी देखील शेअर केली होती. त्याचबरोबर हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन लिहिले होते की, ‘तो घरी आला आहे.’

सध्या हे जोडपं लंडनमध्ये एकत्र क्वॉलिटी टाइम घालवत आहेत. हे दोघंही कधी लंच तर कधी डिनरसाठी एकत्र दिसून येत आहेत. हे जोडपे चेल्सीमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसून आले आहे. या फोटोमध्ये प्रियांका झेब्रा प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर निक रंगीबेरंगी शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी, अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासशी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांच्या या राजेशाही लग्नाची अनेक दिवस चर्चाही होती. त्यांच्या लग्नाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर

-करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य

-शतक ठोकल्यानंतर सुनील शेट्टीने केली केएल राहुलची प्रशंसा; नेटकरी म्हणाले, ‘पहिल्यांदाच सासऱ्याने जावयाची…’

हे देखील वाचा