इंडियन आयडल १२ च्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर पवनदीप राजनने त्याच्या भावना मीडियासमोर व्यक्त केल्या आहेत. हा एवढा मोठा किताब मिळवल्यानंतर पवनदीपने त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि साहाय्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. सोबतच तो म्हणाला, “ट्रॉफी घेत असताना मला फार वाईट वाटत होते,कारण माझे असे मत आहे की, सर्वजण आपापल्या जागी समान आहेत.”
पुढे पवनदीप म्हणाला, “मला अनेक आकलकरांसाठी गाणे गाण्याची इच्छा आहे, मात्र त्यातही मला दिग्गज अभिनेता सलमान खानसाठी गाणे गायचे आहे. सोबतच जर मला ए आर रहमान आणि प्रीतम दा यांच्या साठी गाणे गाण्याची संधी मिळाली तर माझे सर्वात मोठे स्वप्नच पूर्ण होईल. करण जोहर यांनी सुद्धा मला धर्मा प्रोडक्शनसाठी गाण्याची ऑफर दिली आहे. मी हे गाणे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. सोबतच ए आर रहमान यांनी मला आधीच संधी दिली आहे. तसेच मला हिमेश रेशमिया सरांनी मला प्लेबॅक गाण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचेही आभार.” त्याने हिमेश रेशमिया, विशाल ददलानी, सोनू कक्कड, अनु मलिक आणि नेहा कक्कड या सर्व परीक्षकांना देखील धन्यवाद म्हटले आहे. पवनदीप हा अतिशय सुरेल आणि उत्तम गायक असण्यासोबतच तो जवळपास सर्वच वाद्ये देखील वाजवतो. २०१५ मध्ये त्याने ‘द व्हॉईस ऑफ इंडिया’ हा टीव्ही शो जिंकला होता.
उत्तराखंड मध्ये राहणाऱ्या पवनदीपला आपल्या प्रदेशात एक संगीत विद्यालय सुरू करायचे आहे. तेथील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि या भागातील मुलांना उत्तम शास्त्रशुद्ध संगीत शिक्षण मिळावे असे त्याला वाटते. त्याने हे देखील सांगितले की, तो इतर सर्व स्पर्धकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. आतापर्यंत पवनदीपने १२ देशांमध्ये आणि भारतातील १४ राज्यांमध्ये म्युझिक शो केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा










