[rank_math_breadcrumb]

‘जना नायकन’च्या कमाईला ब्रेक? सहाव्या दिवशी जमा झाले केवळ इतके कोटी

अनेक अडचणी पार करून अखेर थलपती विजय अभिनित ‘जना नायकन’ हा चित्रपट 23 जुलै रोजी चित्रपट गृहामध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होता आज तमिळनाडूमध्ये अक्षरशा एका पोंगल किंवा एखाद्या सणासारखा हा दिवस साजरा करण्यात आला. चित्रपटाच्या रिलीज दिवशी थेटर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तसेच विजयचे भव्य स्वागत करण्यात आले होते. सध्या हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे संमिश्र प्रतिक्रिया आता येत आहे. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला कमाई केली आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींहून अधिक कमाई केली होती. नंतर ‘जना नायकन’च्या सुरुवातीच्या कमाईनंतर, हा चित्रपट लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले आहेत, तरीही त्याने 200 कोटींचा टप्पा गाठलेला नाही. चला तर मग, जाणून घेऊया ‘जना नायकन’ने आतापर्यंत किती कमाई केली आहे.

थलपथी विजयच्या (viajy)चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. SacNilc च्या मते, प्रर्दशानाच्या चौथ्या दिवशी 32 कोटी आणि पाचव्या दिवशी 10.65 कोटी जमा केले. आता सहाव्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी जाहीर झाली असून, मंगळवारी चित्रपटाने फक्त 8 कोटींची कमाई केल्याचे दिसून येते. तसेच चित्रपटाची एकूण भारतीय कमाई 167.57 कोटी आणि निव्वळ कमाई 143.40 कोटींवर पोहोचली आहे. जगभरातील कमाईबाबत पाहायचे झाल्यास या चित्रपटाला परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आणि जगभरात आतापर्यत 246.07 कोटींची कमाई केली आहे.

‘जना नायकन’ च्या कमाईची गती आता जरी कमी आली असली तरी पुढे कमाई वाढु शकते आणि अनेक प्रेक्षक वीकएंडला सुध्दा जास्त करुन चित्रपट पाहतात. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. 

‘हा सिनेमा सगळ्यांचा मेंदू हलवून टाकणार आहे,’ टॉक्सिक सिनेमाबाबत यशचे वक्तव्य