Friday, September 18, 2026
Home मराठी भारीच की! गुजरातीमध्ये बनणार ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेचा रिमेक, प्रोमो व्हायरल

भारीच की! गुजरातीमध्ये बनणार ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेचा रिमेक, प्रोमो व्हायरल

मराठी टेलिव्हिजनवर अनेक मालिका लोकप्रिय ठरत आहेत. यातील कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. एक आगळी वेगळी कहाणी घेऊन आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील पात्र, त्यांची वेशभूषा, मालिकेची कहाणी प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेत अनेक वळणं आली आहेत. अभिमन्यू आणि लतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशातच मागील अनेक दिवसांपासून एका गुजराती मालिकेचा प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे. जो अगदी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेसारखा दिसत आहे.

हो अगदी बरोबर ओळखलंत! गुजरातीमध्ये ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा रिमेक बनणार आहे. सोशल मीडियावर मागील अनेक दिवसापासून या गुजराती मालिकेचा प्रोमो व्हायरल होत आहे. या दोन्ही मालिकांचे कथानक सारखेच असल्याचे समजत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.

या मराठी मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहेत. एक मुलगी जाड असल्याने तिच्या बापाला तिचे लग्न करण्यासाठी किती उंबरठे झिजवावे लागतात, हे या मालिकेत दाखवले आहे. ३४ नकार आल्यानंतर मुलीचे लग्न ठरते, पण हुंडा या अनिष्ट प्रथेमुळे मुलीचे लग्न पुन्हा एकदा मोडते. त्यानंतर एका मुलाला लग्नाला उभे राहावे लागते.

यानंतर भौतिक गोष्टी सोडून त्यांच्या प्रेम कहाणीला कशी सुरुवात होते, हे या मालिकेत दाखवले आहे. आता गुजरातीमध्ये देखील ही मालिका चांगलीच चालणार आहे अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

हे देखील वाचा