अभिनेत्री प्रिया बापटने चित्रपटसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका साकारण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.
प्रियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने रंगीबेरंगी एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती दिलखुलास हसताना दिसत आहे. या ड्रेसवर कानात मोठे रिंग्स घातले आहेत. यासोबत तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. तिची या फोटोतील स्माईल पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. (marathi actress priya bapat share her beautiful photos on social media)
प्रियाचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. तिचे चाहते हार्ट ईमोजी तसेच फायर इमोजी पोस्ट करत आहेत. याआधी देखील प्रियाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.
अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
याशिवाय प्रिया संजय दत्तसोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिची आणि तिचा पती उमेश कामत यांची ‘आणि काय हवं’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत










