सध्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून, कामातून सुटका मिळवत कलाकार मालदीवला निसर्गातील सुखाचे क्षण अनुभवत आहेत. अशात सध्या तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी मालदीवला आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनी तिच्या कुटुंबाबरोबर मालदीवला गेली आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सध्या मालदीवमधील अनेक फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
सनीने तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील ती मालदीवमध्ये करत असलेली धमाल शेअर करत आहे. सनीने या फोटोंमध्ये निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. यामध्ये ती आणखीनच हॉट दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरपूर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सनीच्या या फोटोंनी चाहते पुरते घायाळ झाले आहेत. (Sunny Leone enjoying family Holiday inn Maldives actress gorgeous look viral in social media)
त्याचबरोबर सनीने काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. यामध्ये ती समुद्रकिनारी उभी राहून वेगवेगळ्या पोझ देत आहे. तसेच तिच्या हातामध्ये शॅम्पेनची बॉटल देखील आहे. शॅम्पेनची बॉटल खोलत ती निसर्गाच्या छायेत आनंद व्यक्त करत आहे.
सनीचे हे फोटो पाहून तिचे आयुष्य ती किती सुखात आणि कसलीही चिंता न करत जगत आहे, हे समजते. सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वर्गामध्ये तुमचे स्वागत आहे. माझ्याशिवाय इथे कोणत्याच रोक- टोकला अनुमती नाहीये. हा पार्टी करण्याचा आणि जीवनातील उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे.” यासह तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या परिवाराबरोबर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

सनी तिच्या अनोख्या आणि मजेशीर पोस्टने देखील नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने असाच एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये सनी जमिनीवर लोटांगण घालताना दिसली होती. तिला तेथील एका महिलेने विचारले, “सनी तू हे काय करत आहेस?” त्यावर सनी उत्तर देत म्हणाली होती की, “मी प्रोडक्शनचे पैसे वाचवत आहे.” या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. खाली माती असल्याने तिचे संपूर्ण कपडे खराब झाले होते.
काही दिवसांपूर्वी सनी बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथे तिने स्पर्धक दिव्या अग्रवालचे सगळ्यांसमोर भरपूर कौतुक केले. दिव्याला सनी म्हणाली की, “मला तुझ्यावर गर्व आहे, आणि माझ्या कुटुंबियांना देखील तुझा अभिमान वाटतो.” तसेच पुढे सनीने दिव्याला सांगितले की, “आम्ही सर्वजण रोज बिग बॉस पाहतो आणि आम्हाला सर्वांना तू ज्या पद्धतीने टास्क पूर्ण करते ते खूप आवडते.”
सनीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर तिने नुकतेच ‘शिरो’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट बहुभाषिक असून तो तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ती ‘पट्टा’ चित्रपटात क्रिकेटर- अभिनेता श्रीसंतसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!
-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ