Friday, February 20, 2026
Home मराठी अरे या कंगनाला कोणीतरी आवरा! शशी थरूर आणि कंगना यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरू

अरे या कंगनाला कोणीतरी आवरा! शशी थरूर आणि कंगना यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरू

नेता असो वा अभिनेता , कंगना रनौत पंगा घेण्यास मागे हटत नाही. तिला सतत कुठल्या ना कुठल्या वादात पडलेलं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. ती एकत्र स्वतःहून काही तरी वादग्रस्त ट्विट करते अन्यथा एखाद्या महत्वपूर्ण राष्ट्रीय घडामोडीवर ट्विटरद्वारेच व्यक्त होते जे पुढे जाऊन वादग्रस्त ठरतं. अभिनेता आणि गायक दिलजित दोसांज याच्याबरोबर तिचं ट्विटर वॉर इतकं जुनं झालं नव्हतं की ती आता काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी भिडली आहे. ५ डिसेंबर रोजी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्विट केलं होतं यावर कंगनाने त्यांना प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेवर शशी थरूर यांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमका हा क्रिया प्रतिक्रियेचा खेळ तरी काय आहे तो समजून घेऊयात.

सर्वात आधी शशी थरूर यांनी ट्विट केलं होतं की, ‘घरगुती कामांना पगाराच्या नोकरीचा दर्जा देण्यात यावा आणि राज्य सरकारांनी घरकाम करणार्‍या महिलांना मासिक भत्ता मिळाला पाहिजे, श्री कमल हसन यांच्या या कल्पनेचं मी स्वागत करतो. यामुळे घरी काम करणार्‍या महिलांना ओळखही मिळेल आणि त्यांच्या सेवांसाठी त्यांना मूल्य देखील मिळेल. त्यांची शक्ती वाढेल आणि त्यांना मूलभूत उत्पन्नापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.’

शशी थरूर यांच्या या ट्विटला कंगनाने प्रतिक्रिया दिली ती अशी, ‘आमचं प्रेम पैशावर तोलू नका. आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी आम्हाला पैसे देऊ नका. आपल्या स्वत: च्या छोट्याशा रियासतीसारख्या घराची राणी होण्याकरिता आम्हाला पैशांची गरज नाही. प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून पाहणे थांबवा. आपल्या स्त्रीबद्दल पूर्णपणे समर्पित व्हा. तिला फक्त तुमचं प्रेम आणि आदर हवा आहे.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1346332993577771008?s=20

 

कंगनाच्या या प्रतिक्रियेला शशी थरूर यांनी एक प्रतिक्रिया दिली ती अशी,’कंगना रनौत, मी तुमच्याशी सहमत आहे. घरगुती महिलेच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी अशा असतात ज्याला मोल देता येत नाही. परंतु ही गोष्ट त्या बाबींबद्दल नाही. हे त्यांच्या कामाचं मूल्य आहे जे त्यांना कधीही दिलं जात नाही आणि ते प्रत्येक महिलेच्या मूलभूत उत्पन्नासाठी देखील गरजेचं आहे. सर्व भारतीय स्त्रिया तुमच्याइतक्या बळकट असाव्यात, सक्षम असाव्यात अशी माझी इच्छा आहे.’
त्यांच्या या ट्विटवर अजूनही कंगनाचं काहीच उत्तर आलेलं नाही त्यामुळे तिच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्व माध्यमांच्या तसेच दोघांच्याही चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा