प्रत्येक नातेसंबंधात जिथे गोडवा, प्रेम, आपुलकी असते, तिथे अनेकदा वादही निर्माण होतात. मात्र, हे वाद अनेक नाती संपावतात. तर कित्येक वेळा भांडण झाले, तर नातेवाईक एकमेकांशी बोलणं सोडून देतात. असेच काही नातेसंबंध बाॅलिवूड इंडस्ट्रीतही आहेत. अगदी मामा- भाच्यांमधेही वाद आहेत. कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील भांडणाची गेली कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हे दोघे एकमेकांशी फक्त बोलतच नाहीत, तर ते एकमेकांसमोर उभा राहायला देखील तयार नाहीयेत. या दोघांची जोडी अभिनयापेक्षा त्यांच्यात होणार्या वादांमुळेच अनेकदा चर्चेत असते.
‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात कृष्णा अभिषेकचा मामा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. पण मामा-भाचे या शोमध्ये एकत्र दिसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, कृष्णा अभिषेकने खुलासा केला आणि म्हणाला की, “आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असतानाच मी दूसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’चे शूटिंग करत आहे. त्यामुळे माझी रोजची धावपळ सुरू आहे.” त्यामुळे कृष्णा अभिषेक तारीख बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शोच्या आगामी भागाच्या शूटिंगची तारीख बदलणे शक्य नाही.
कृष्णा अभिषेकने सांगितले की, “मी गेल्या १५ दिवसांपासून रायपूर ते मुंबई अशा फेर्या मारत आहे. मी शोसाठी तारीख बदलत काम करत आहे. पण मला जेव्हा समजले की, शोमध्ये गेस्ट म्हणून गोविंदा आणि सुनिता येणार आहेत, तेव्हापासून मी तारीख बदलण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मला या दोघांसोबत शोमध्ये एका मंचावर काम करायचं नाही.”
पुढे बोलताना कृष्णा म्हणाला की, “मी माझ्या बाजूने मत मांडेल आणि ते त्यांच्या बाजूने मत मांडतील. तसेचही हा एक कॉमेडी शो आहे. मला माहित नाही की, यात काय होईल.” तो म्हणाला, “परत वाद निर्माण होईल. पण मला पुन्हा वाद नको आहे. मला माहित आहे की, जेव्हा गोविंदाजी शोमध्ये येतात तेव्हा प्रेक्षक माझ्या विनोदांची वाट पाहत असतात, पण मला समाजाला प्रदर्शन करायचे नाही.” मात्र आगामी भागात काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…