Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड अभिनयात कियारा आडवाणीला जोरदार टक्कर देतेय ही चिमुकली; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

अभिनयात कियारा आडवाणीला जोरदार टक्कर देतेय ही चिमुकली; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

प्रत्येक व्यक्तीच्या अंगात एक कलाकार लपलेला असतो, असं म्हणतात. आपल्याला आवडत्या शिक्षकांची, मित्रांची, कलाकारांची नक्कल करण्याचा सर्वचजण प्रयत्न करत असतात. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडत्या कलाकाराची नक्कल करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. परंतु कधी कधी या कलाकारांप्रमाणे नक्कल करत असताना काही चाहते ती नक्कल एवढी हुबेहूब करतात की, कलाकारापेक्षा त्यांचीच सर्वत्र चर्चा सुरु होते. अशात कियारा आडवाणींची चाहती छोटी कियारा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

‘शेरशाह’ चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांनी उत्तम अभिनय केला. कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा यांच्या भूमिकांना दोन्ही कलाकारांनी पूर्ण न्याय दिला आहे. त्यांच्या या चित्रपटामुळे दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. अगदी लहान मुलांना देखील या दोघांचे वेड लागले आहे. यातीलच एक छोटी चाहती शिवानी खन्नाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या छोट्या मुलीने तिच्या या व्हिडिओमध्ये कमालीचा अभिनय केल्याचे दिसत आहे. कियारा आडवाणींच्या ‘शेरशाह’मधील प्रत्येक लूक तिने साकारला आहे. तसेच यातील बरेचसे डायलॉग या चिमुकलीचे तोंड पाठ आहेत. कियारा खन्नाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सर्वांना तिच्या या व्हिडिओंनी भुरळ घातली आहे. (This little girl is leaving Kiara Advani behind in terms of acting, videos are becoming fiercely viral)

या चित्रपटामध्ये सीमेवरील लढायांसह कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये डिंपल चीमा यांची भूमिका कियाराने खूप उत्तम पणे साकारली आहे. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, एक लहान मुलगा भारतीय सैन्यात जाण्याचे ठरवतो. तो मोठा झाल्यावर तिथे पोहचतो आणि दुश्मनांना देखील चांगलाच झोडतो.

‘शेरशाह’ चित्रपटामधून विक्रम यांच्या आयुष्यातील बऱ्याचश्या बारीक सारीक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या गोष्टी तुम्ही कधी कुठे पाहिल्याही नसतील आणि ऐकल्याही नसतील. आर्मीशी जोडलेल्या गोष्टींपासून ते कॉलेजमधील मस्ती आणि वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्या सेना मिशन कमांडपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसेच कारगिल युद्धामधील ४८७५ पर्यंतचा विजय देखील दाखवण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा