अनेकांच्या आयुष्यात वेगवेगळे जोडीदार येतात. आपल्या जोडीदाराने आपण त्याच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर इतर व्यक्तींचा जोडीदार म्हणून शोध घेणे थांबवले पाहिजे असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविकच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या प्रियकराविषयी एक वेगळे स्थान असते. काहीजण खूप भांडणे, वाद विवाद होऊन देखील आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत, तर काही जण शुल्लक कारणावरून देखील वेगळे होतात. असे प्रेमी वेगळे होण्यासाठीच एकत्र आलेले असतात असे म्हणायला हरकत नाही. अशात टीव्ही वरील कलाकारांसह बॉलिवूडमधील कलाकारांचे देखील मोठे किस्से आहेत. कलाकारांचे प्रेम संबंध सामान्य माणसांपासून कधी लपून राहत नाहीत. यामध्ये काही कलाकार आदर्श जोडपे बनलेले असतात. परंतु ते सुद्धा आपले नाते तोडून चाहत्यांना मोठा धक्काच देतात. अशाच काही जोड्यांबद्दल जाणून घेऊ.
ऋत्विक धनजानी- आशा नेगी
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून ऋत्विक आणि आशाने प्रेमाचा एक वेगळा इतिहास रचला होता. अभिनय करता करता दोघे एकमेकांच्या एवढे जवळ कधी आले, हे समजलेच नाही. या मालिकेमध्ये दोघांची दाखवलेली प्रेम कहाणी तरुणाईला खूप भावली होती. अनेक तरुण, तरुणी या दोघांकडे एक आदर्श जोडपे म्हणून पाहत होते. अनेक वृत्तांमध्ये या दोघांच्या प्रेमाचा उल्लेख होऊ लागला होता आणि हे जोडपे खूप चर्चेत होते. सोशल मीडियावर देखील ते नेहमी आपल्या प्रेमाविषयी चाहत्यांना सांगायचे. आता हे दोघे लग्न करणार असे चाहत्यांना वाटत होते, परंतु काही काळानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले. (Rithvik asha to Amir sanjeeda this star’s were used to known as TV love birds their breakup made fans shocked)
आमिर अली-संजीदा शेख
आमिर आणि संजीदा या दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी खूप पसंती दिली. आपल्यातील प्रेमाला त्यांनी पती पत्नीच्या नात्यामध्ये बदलले. साल २०१२मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न गाठ बांधली. लग्नामध्ये त्यांनी केलेली मौज मज्जा त्यांनी सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. यावर त्यांचे चाहते देखील खूप खुश होते. सर्वांनी या दोघांना आयुष्यभर असेच एकत्र रहा अशा शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु साल २०२०च्या दरम्यान या दोघांमधल्या वादाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसेच संजीदा आपल्या पतीचे घर सोडून तिच्या माहेरी राहत आहे अशी चर्चा सुरु होती. परंतु या सर्वांवर आमिरने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
पूजा गौर- राज अरोरा
‘कोई आने को है’च्या सेटवर राज्य करणारे पूजा आणि राज यांची प्रेम कहाणी खूप चर्चेत होती. हे दोघे देखील खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांमधील एकमेकांवरचे प्रेम पाहून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. परंतु काही वादांमुळे हे दोघे आधीच वेगळे झाले होते. आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी साल २०२०मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले असल्याची घोषणा केली. त्यांच्या या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या या दोघांमधील प्रेमाचे नाते संपले असले, तरी मैत्रीचे नाते अद्याप टिकून आहे.
करण सिंग ग्रोवर- जेनिफर विंगेट
‘दिल मिल गये’ या मालिकेमध्ये अभिनय करता करता करण आणि जेनिफर या दोघांचेही मने जुळली होती. मालिकेमधून या दोघांनी प्रेमाचा इतिहास तर रचलाच होता, अशात हे दोघे आपल्या खऱ्या आयुष्यात देखील एकत्र आल्याने चाहत्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला होता. यानंतर साल २०१२मध्ये त्यांनी विवाह केला. पण अवघ्या दोन वर्षांमध्ये त्यांच्यात वाद होऊ लागल्याने साल २०१४मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले.
दिव्यांका-शरद
दिव्यांका आणि शरद हे दोन्ही कलाकार ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेमधून खूप चर्चेत आले होते. दोघांमधील मैत्री वाढून ती प्रेमामध्ये कधी बदलली हे समजलेच नाही. एकूण आठ वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. परंतु लग्नाची परिभाषा सांगणारी ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेमध्ये उत्तम अभिनय करणारे हे कलाकार लग्नगाठीमध्ये कधी अडकलेच नाही. त्यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेक दिवसांनी दिव्यांकाने या घटनेने तिला खूप त्रास झाला होता आणि ती पूर्णपणे खचली होती असे सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण
-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा