Monday, March 30, 2026
Home बॉलीवूड चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोराच्या सौंदर्याचे गुपीत आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोराच्या सौंदर्याचे गुपीत आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये आणखी एका सुंदर अभिनेत्रीचा उल्लेख केला जातो. ती अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही होय. नोराने आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. नोराचे फॅन फॉलोविंग देखील खूप मोठी आहे. त्याचबरोबर तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या नृत्यामुळेच तिची फॅन फॉलोविंग जास्त आहे. आज आपण नोराला कोणती सौंदर्य उत्पादने वापरायला आवडतात, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

अगोदर हे घेऊ जाणून
अभिनेत्री नोराची मेकअप उत्पादने जाणून घेण्यापूर्वी, हे जाणून घेऊया की, नोरा मुख्यतः मेकअपशिवाय राहणे पसंत करते. नोरा आवश्यक असल्याशिवाय मेकअप लावत नाही. आपल्या सर्वांना हे नक्कीच माहिती की, मेकअपशिवाय त्वचा श्वास घेण्यास आणि निरोगी राहण्यास सक्षम असते.

मिक्स करून फाऊंडेशन लावा
जेव्हा नोराला मेकअप करावा लागतो, तेव्हा ती निश्चितपणे फाऊंडेशन लावते. चांगला मेकअप हा फक्त चांगल्या बेसवर करता येतो. त्यामुळे फाऊंडेशन लावणे आवश्यक आहे. तसेच त्यासोबत योग्य शेड देखील आवश्यक आहे. नोरा एक गडद आणि एक हलक्या रंगाचे फाऊंडेशन मिक्स करून ती आपल्या चेहऱ्यावर लावते.

गुलाबी लिपस्टिक आवडते
नोराची गो टू लिपस्टिक शेड गुलाबी आहे. तिला जास्त करून गुलाबी रंगाची लिपस्टिक लावायला खूप आवडते. अर्थात तिच्या लिपस्टिकची निवड मेकअपवर आधारित असते. परंतु नोराला गुलाबी रंगाचा शेड लावायला आवडतो. नोराच्या गुलाबी ओठांचे हे रहस्य आहे.

मस्करा आवश्यक आहे
अभिनेत्री नोराला आपल्या मेकअपवर आणखी एक गोष्ट लावायला खूप आवडते. ते म्हणजे मस्करा होय. ती डोळ्यांना काजळ लावत नाहीत. मात्र, मस्करा लावायला ती कधीच विसरत नाही. यामुळे नोराच्या डोळ्यांचे सौंदर्य दुप्पट दिसते.

हाई लायटर आणि फेस पावडर
नोराकडे नेहमी फेस पावडर असते. मेकअप व्यतिरिक्त, ती तिच्या चेहऱ्याला स्वच्छ लूक देण्यासाठी वापरते. तसेच चेहऱ्याभोवतीचा घाम कोरडा करण्यासाठी देखील वापरते. नोराला हायलाइटचा वापर करायलाही खूप आवडतो. त्याचबरोबर, नोराला तिच्या चेहऱ्याचा कोणता भाग हायलाईट करायचा असेल, तर त्याचा ती वापर करते.

नोरा एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. त्यामुळे तिला सर्वत्र ‘दिलबर गर्ल’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसली आहे. त्यांचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच तिचे ‘कोका कोला’ हे गाणे देखील खूप गाजले आहे. या गाण्यावरील तिच्या डान्स स्टेप्स देखील खूप व्हायरल झाल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा