Friday, June 5, 2026
Home मराठी स्टायलिश अन् रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मृण्मयी दिसतेय एकदम झक्कास; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

स्टायलिश अन् रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मृण्मयी दिसतेय एकदम झक्कास; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील तिचे ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे, तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते. अशातच तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

अलीकडेच मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने खूप सुंदर, स्टायलिश आणि रंगीबेरंगी एक लाँग ड्रेस घातला आहे. तिने घातलेल्या या पांढऱ्या ड्रेसवर वेगवेगळ्या रंगाच्या छटा उमटलेल्या दिसत आहेत. ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे. या ड्रेसवर तिने कानात रिंगा घातल्या आहेत. (Marathi actress mrunmayee deshpande share her photo on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या ती ‘सारेगामापा लिटल चॅम्प्स’ या गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजश्री प्रधान म्हणाली, ‘कॅप्शन सुचवा’; चाहत्यांनी दिलखेचक फोटोवर पाडला कौतुकांचा पाऊस

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

हे देखील वाचा