लोकप्रिय अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि अभिनेता नागा चैतन्य हे दक्षिण इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध जोडपं आहे. परंतु या दोघांच्या नात्यामध्ये कटुता आली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या नात्याबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांपैकी अजून कोणीही यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असूनही त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा वेगाने वाढत आहेत. ज्याप्रकारे समंथाने ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून, सर्व सोशल मीडिया अकाउंटवर एस असे केले आहे, त्यामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.
समंथा आणि चैतन्य यांच्यात नक्की चाललंय काय?
काही दिवसांपूर्वीच समंथा तिचे सासरे नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित राहिली नाही. मात्र जेव्हा तिला हा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला होता, तेव्हा ती म्हणाली की, “मी याबद्दल तेव्हाच बोलेन जेव्हा माझी उत्तर द्यायची इच्छा असेल. तेव्हा नाही जेव्हा लोक मला हे प्रश्न विचारतील.” समंथा आणि चैतन्याच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री आठवत आहे. ते विश्वास ठेवू शकत नाहीत की, ज्या जोडप्यामध्ये इतकी चांगली केमेस्ट्री आहे, ते वेगळे कसे होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी, जेव्हा समंथा आणि चैतन्य एकत्र एका शोमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. (Samantha and Naga Chaitanya’s chemistry captivated the fans)
याच शो दरम्यान, त्यांनी जास्त विचार न करता एकाच वेळी योग्य उत्तर देऊन त्यांच्या चाहत्यांना ही आश्चर्याचा धक्काच दिला. समंथाने अक्कीनेनी कुटुंबाच्या आवडत्या सुट्टीच्या ठिकाणापासून समंथाच्या आवडत्या जेवणापर्यंत योग्य उत्तर दिले होते.
माध्यमांतील वृत्तानुसार, नागा चैतन्यच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “नागा इतका प्रेमळ आहे की, त्याला ऑनस्क्रीन त्याच्या पत्नीकडे रागाने पाहायचे होते. तो हे सुद्धा नीट करू शकला नाही. मात्र आता जेव्हा त्याला समंथा सोबत नातेसंबंध नीट करण्याबद्दल सांगितले जाते तेव्हा त्याला कुठून सुरुवात करावी हे समजत नाही. लग्न केल्यापासून तो एक प्रेमळ पती राहिला आहे.” समंथा आणि नागा चैतन्य यांनी ‘ऑटोनगर सूर्य’, ‘यूएस’, ‘माजिली’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर
-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया










