उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्राजक्ताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात एक सुंदर नेकलेस घातला आहे. व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असणारे गाणे लागले आहे. (Marathi actress Prajakta mali share her video on social media)
तिचे चाहते या लूकवर सातत्याने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिच्या फोटोला नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. तिचा हा लूक तर सर्वांना खूप आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आताच आईला तुझा व्हिडिओ दाखवला. ती हो म्हणाली, सांग मग बोलणी करायला कधी येऊ.” आणखी एकाने कमेंट केली आहे की, “काय करावं तुझ्या सुंदरतेचे प्राजू, का आम्हाला एवढी घायाळ करतेस, करत रहा.”
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना
-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती