Monday, January 19, 2026
Home कॅलेंडर बाबो! रागाने लालबुंद झालेला सलमान थेट घुसला बीग बॉसच्या घरात, पाहा काय होतं ‘ते’ गंभीर कारण

बाबो! रागाने लालबुंद झालेला सलमान थेट घुसला बीग बॉसच्या घरात, पाहा काय होतं ‘ते’ गंभीर कारण

सध्या बिग बॉस १४ सुरू आहे. त्यामुळे दर आठवड्याला आपल्याला बिग बॉसच्या घरातून काही ना काही खुमासदार बातम्या मिळतच असतात. दररोज कुणी ना कुणी कोणाची तरी उणी धुणी काढत असतो. त्यामुळे घरात राडे होणं तर कन्फर्म असतं. यानंतर दर विकेंडला शोचा होस्ट आणि आपल्या सगळ्यांचा दोस्त भाईजान सलमान येतो. शनिवारी आणि रविवारी दोन दिवशी सलमान एकप्रकारे प्रत्येक गोष्टीचा न्याय निवाडाच करतो. यावेळी तो हसतो, रागावतो, स्पर्धकांच्या फिरक्या घेतो. पण सलमान जर रागावला तर मग स्पर्धकांना फार भारी पडतं. असाच प्रकार विकेंडच्या या वाराला घरामध्ये घडला आहे. स्पर्धकांचा सलमानला राग आला आहे, त्यामुळे चिडून सलमान बिग बॉसच्या घरातच प्रवेश करतो. यानंतर जे घडतं तेच आता आपण पाहणार आहोत.

शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एजाज खान सलमानला सांगतो की, निक्की तांबोळीने राखी सावंतचा पलंग तयार करण्यास नकार दिला. जेव्हा सलमानने निक्कीला याचे कारण विचारले तर ती म्हणाली, “सर, मला बनवायचे नाही.” त्याला उत्तर म्हणून सलमान म्हणतो, “तुला तो बनवायचा नसेल तर हरकत नाही. थांब, मी आलोच.”

यानंतर सलमान घरात शिरला आणि राखी सावंतच्या वस्तू उचलण्यास सुरूवात केली. एली गोनी सलमानला रोखण्याचा प्रयत्न करतो पण सलमान थांबत नाही. मग तो राखीचा पलंग आवरायला लागतो. यावर राखी म्हणाली, “सर, नका करू?” परंतु सलमानने याकडे दुर्लक्ष केले आणि “कोणतेही काम क्षुल्लक नसते. जर हेच काम एखादया सिनेमात किंवा मालिकेत आपल्याला करायचं असत तर आपण १००% परफॉर्मन्स दिला असतात” असं सांगून कुटुंबातील सर्व सदस्यांना त्याने सुनावलं.

सुत्रांनुसार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी या शोचा अंतिम भाग प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी स्पर्धकांनाही अंतिम भागाची हीच तारीख सांगितली गेली होती. जरी शोच्या कालावधीचा उल्लेख केला गेला असला, तरी अशी कोणतीही योजना आता शोच्या मेकर्सने सांगितलेली नाही. हा कार्यक्रम अधिक मनोरंजक बनविण्यासाठी येत्या आठवड्यात निर्मात्यांनी आणखी काही वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्याची योजना आखण्याचा विचार केला आहे.

हे देखील वाचा