Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड पांचगणीत ड्रायव्हिंग करताना कार्तिक आर्यन विसरला रस्ता; मदत करण्यापूर्वी पोलिसाने घेतला सेल्फी

पांचगणीत ड्रायव्हिंग करताना कार्तिक आर्यन विसरला रस्ता; मदत करण्यापूर्वी पोलिसाने घेतला सेल्फी

कलाकार हे सामान्य व्यक्तींसाठी आकर्षण असतात. ते जिथे कुठे जातील, त्यांच्या भोवती चाहते गराडा घालतात. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते खूपच उत्साही असतात. फक्त सामान्य व्यक्तीच नाही, तर पोलीसांनाही कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. असेच काहीसे आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबाबत घडले आहे.

खरं तर, कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो पांचगणीतील रस्त्यावरून गाडी चालवत कुठेतरी जाताना दिसत आहे. मात्र, त्याला समजत नाही की, कोणत्या रस्ताने जायचे आहे. यादरम्यानच एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत आहे. तसेच कार्तिकला विचारत आहे की, “तुम्हाला कुठे जायचे आहे?” यावर कार्तिक म्हणतो की, “कदाचित मी चुकीचा राईट घेतला आहे.” यानंतर व्हिडिओ बनवत असलेला व्यक्ती म्हणतो की, “काय राव तुम्हीही…”

पोलिसानेही घेतला सेल्फी
यावेळी कार्तिकला पाहून एक पोलीस अधिकारी त्याची मदत करण्यासाठी पुढे येतो. मात्र, मदत करण्यापूर्वी पोलीस अधिकारी कार्तिकसोबत सेल्फी घेतो. हे पाहून कार्तिकही हसू लागतो. पोलीस अधिकारी अभिनेत्याला चष्मा काढून सेल्फी घ्यायला सांगतात. यानंतर ते कार्तिकला विचारतात की, “तुम्हाला शूटिंगसाठी उशीर तर होत नाहीये ना?” यावर कार्तिक “नाही,” असे म्हणतो.

कार्तिक पांचगणीत शशांक घोष यांच्या ‘फ्रेडी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कार्तिकने पांचगणीत ‘फ्रेडी’ आणि ‘भूल भुलैया २’ या चित्रपटांचे क्लायमॅक्स सीन शूट केले आहेत.

कार्तिकच्या ताफ्यात आहे चित्रपटांची रांग
कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. याव्यतिरिक्त कार्तिक सन २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भुलैया २’मध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीसह आणि ‘फ्रेडी’मध्ये अभिनेत्री अलाया एफसोबत झळकणार आहे. तसेच कार्तिक अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे अभिनित दाक्षिणात्य हिट चित्रपट ‘अल्ला वैकुंठपुरमलो’च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेत्री क्रिती सेननसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्मा क्रिकेटपटूंच्या ‘लव्ह मॅरेज’वर बोलला ‘असे’ काही, जे ऐकून वीरेंद्र सेहवाग झाला लोटपोट

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी पडली वादाची ठिणगी, ‘या’ कारणामुळे जय आणि मिरा यांच्यात भांडण

हे देखील वाचा