Sunday, April 26, 2026
Home मराठी शिवानी बावकरच्या ‘कुसुम’ मालिकेचा प्रोमो व्हायरल; ‘या’ दिवसापासून सीरियल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिवानी बावकरच्या ‘कुसुम’ मालिकेचा प्रोमो व्हायरल; ‘या’ दिवसापासून सीरियल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री शिवानी बावकर हिच्या नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवानीने तिची एक नवीन मालिका येत आहे याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. अशातच शिवानीने मालिकेचा आणखी एक प्रोमो शेअर करून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, हे सांगितले आहे.

आपल्या समाजात मुलींना त्याच्या आई-वडिलांसोबत केवळ लग्न होईपर्यंत राहता येते. एकदा का त्या सासरी गेल्या की, माहेरी त्यांचा समावेश केवळ जेवणातील कोशिंबिरी इतका राहतो, पण समाजातील या चालीरीती बदलून मुली सासर, माहेर आणि त्यांचे काम किती उत्तमरीतीने सांभाळू शकतात ही एक आगळी वेगळी कहाणी या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.

शिवानीच्या नवीन मालिकेचे नाव ‘कुसुम’ असे आहे. या मालिकेत शिवानीसोबत अभिनेत्री आरती मोरे दिसणार आहे. शिवानीने या मालिकेचा प्रोमो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आई बापाला जपणारी कुसुम येतीये तुमच्या भेटीला, नवीन मालिका कुसुम, ४ ऑक्टोंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.” (Shivani baokar’s new serial’s promo viral on social media)

एक मुलगी सासर आणि माहेर किती उत्तमरित्या सांभाळू शकते ही कहाणी मालिकेतून दाखवणार आहेत. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या नव्या-कोऱ्या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध निर्मात्या एकता कपूर या करत आहे. बालाजी टेलिफिल्म्स निर्मित या मालिकेची कहाणी जबरदस्त असणार आहे. असा अनेक प्रेक्षक अंदाज लावत आहे.

शिवानीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचे शितल हे पात्र खूप गाजले होते. या मालिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर तिने ‘उंडगा’ आणि ‘युथ ट्यूब’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्मा क्रिकेटपटूंच्या ‘लव्ह मॅरेज’वर बोलला ‘असे’ काही, जे ऐकून वीरेंद्र सेहवाग झाला लोटपोट

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी पडली वादाची ठिणगी, ‘या’ कारणामुळे जय आणि मिरा यांच्यात भांडण

हे देखील वाचा