टीवी आणि बॉलिवुड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय राहते. अंकिता तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट देण्यासाठी, ती सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
अंकिता लोखंडे गेल्या काही काळापासून बरीच चर्चेत आहे. आजकाल ती ‘पवित्र रिश्ता’च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकत आहे. त्याचबरोबर अभिनेता शाहीर शेख या मालिकेत मानव म्हणजेच सुशांत सिंग राजपूतची भूमिका साकारत आहे. ‘पवित्र रिश्ता’च्या पहिल्या सीझनमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं होतं. यानंतर, दोघांनी खऱ्या आयुष्यातही अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं. पण काही वर्षांनी दोघांचं ब्रेकअप झालं. अंकिता लोखंडे सध्या विकी जैनला डेट करत आहे. शिवाय दोघेही लवकरच लग्न करू शकतात, अशा बातम्याही येत आहेत.
नुकताच अंकिताने बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अंकिता गुलाबी रंगाच्या साडीमध्ये, तर विक्की कुर्ता पायजमात दिसत आहे. हा फोटो शेअर करत अंकिताने लिहिलंय की, “देवाने तुमच्यासाठी बनवलेल्या प्रेमकथेला अजिबात हलक्यामध्ये घेऊ नका. देव तुमच्यासाठी ते करतो जे तुम्ही त्याच्याकडून मागू शकत नाही आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.”
या फोटोमध्ये अंकिता विकीला किस करताना दिसत आहेत. तर या रोमँटिक फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. असे म्हटले जात आहे की, दोघे लवकरच लग्न करू शकतात.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर
-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू