शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री. मागील काही महिन्यांपासून शिल्पा आणि तिच्या कुटुंबाला मोठ्या कठीण प्रसंगांना आणि परिस्थितीला सामोरे गेली. मात्र आता हळूहळू शिल्पा अमान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा मधल्या काळात यापासून बरीच लांब होती. मात्र आता ती पुन्हा सोशल मीडियावर परतली आहे. तिचे फॅन्स तिच्या पोस्टची आतुरतेने वाट बघतात. सध्या शिल्पा सोशल मीडियावर तिचे कमी आणि तिच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ जास्त पोस्ट करत आहे.
शिल्पासाठी तिचे मुलं किती महत्वाचे आहे याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला येतो. शिल्पाच्या नवऱ्याला राजला अटक झाल्यानंतरही तिने तिच्या मुलांसाठी मीडियाला तिच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती देखील केली होती. शिल्पाला विवान आणि समिशा अशी दोन मुलं आहेत. त्यात समिशा तिला सरोगसीचा माध्यमातून दीड वर्षांपूर्वी झाली.
शिल्पा अनेकदा तिचे आणि समिशाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते, मात्र आता तिचे तिच्या आणि समिशाच्या फोटोंचे एक कोलाज बनवत त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि समिशा यांचे मोजके आणि निवडक फोटो ते अतिशय आकर्षक आहेत. शिल्पा आणि समिशाचे सुरेख बॉंडिंग यात दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले, “जोडणे आणि जिंकणे माझ्या छोट्या समिशासोबत”
शिल्पाचा हा व्हिडिओ फॅन्स आणि कलाकारांमध्ये चांगलाच गाजत आहे. यावर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहे. नुकताच शिल्पाने तिच्या दोन्ही मुलांचा योगा करत असल्याचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये समिशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
याआधी देखील गणपतीच्यावेळी शिल्पा आणि समिशाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये शिल्पा आणि समिशा यांनी एकसारखेच कपडे घातले होते. तत्पूर्वी मागील काही काळापासून शिल्पा आणि समिशा यांना बऱ्याचदा सारख्या कपड्यांमध्येच पहिले जात आहे.
राज कुंद्राला नुकतीच ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. राज कुंद्राला जामीन मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक










