हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर खानदानाचा एक वेगळाच दबदबा आहे. कपूर खानदानातील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. या खानदानातीलच एक म्हणजे ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूर होय. रणबीरनेही वेगवेगळ्या भूमिका साकारून भारतातच नव्हे, तर जगभरात आपला एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. मंगळवारी (२८ सप्टेंबर) रणबीर आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या रणबीर आलिया भट्टसोबत राजस्थानच्या जोधपूर येथे पोहोचला आहे. मात्र, तो तिथे वाढदिवसासाठी गेला आहे की, वेगळंच काहीतरी कारण आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असले तरीही सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की, हे दोघेही लग्नासाठी ठिकाण शोधण्यासाठी जोधपूरला पोहोचले आहेत.
रणबीरला आपल्या वाढदिवशी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनेही रणबीरसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यानच अर्जुनने आलिया भट्टकडेही एक मागणी केली आहे. ती मागणी नेमकी काय आहे? हे जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता लागली असेलच. चला तर मग जाणून घेऊया… (Actor Arjun Kapoor Shares Throwback Unseen Photo With Birthday Boy Ranbir Kapoor Demands Alia Bhatt For This)
खरं तर, अर्जुनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन आण रणबीर आपल्या मित्रांसोब पार्टी करताना दिसत आहेत. हा फोटो खूपच जुना आहे. याचा अंदाज आपण यावरून लावू शकता की, फोटोत अर्जुनचे वजन खूपच वाढलेले दिसत आहे. तसेच रणबीरही खूपच तरुण दिसत आहे.
फोटो शेअर करत अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा फोटो कदाचित मला ही आठवण करून देतो की, मला बर्थडे बॉय रणबीर कपूरसोबत एका चांगल्या फोटोची आवश्यकता आहे. आलिया भट्ट मॅम मला वाटते की, तुम्ही माझी मदत केली पाहिजे. कोणतेही बंधन नसताना मला वयाच्या २१ व्या वर्षी माझा आत्मविश्वास देखील जाणवला. बघा माझी छाती त्याची क्षमता दाखवत आहे.” अर्जुनच्या पोस्टवर कमेंट करत रणबीरचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अर्जुन कपूरच्या या फोटोला आतापर्यंत १ लाख ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ५०० पेक्षाही अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
रणबीर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असतो. रणबीरच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा सन २०१८ मध्ये संजय दत्तची बायोपिक ‘संजू’मध्ये झळकला होता. यानंतर आतापर्यंत तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. असे असले, तरीही तो ‘ब्रह्मास्त्र’, ‘शमशेरा’ आणि ‘ऍनिमल’ या सलग तीन चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल
-‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी