‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करून नावारूपाला आलेला आघाडीचा आणि धडाडीचा अभिनेता, निर्माता आणि लेखक म्हणजे सुबोध भावे होय. सुबोधने चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका निभावून रसिकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तो अनेकवेळा त्याचे फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांशी जोडून असतो. अशातच त्याने त्याचा एक फोटो शेअर करून एक सुंदर कविता त्याच्या चाहत्यांसाठी पोस्ट केली आहे.
सुबोधने अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. यावर त्याने चॉकलेटी रंगाचे ब्लेझर घातले आहे. ज्यामध्ये तो खूप छान दिसत आहे. (Marathi actor subodh bhave share his stylish photo on social media)
हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी, ते स्वप्न उद्याचे ठेव तिथे उशाशी. हा भरला येथे स्वप्नांचा बाजार, घे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार. या इथून गेले यात्रिक अपरंपार, पाठीवर ओझे छोटासा संसार. किती शिणले दमले म्हणता माझे माझे. वाकले मोडले, गेले टाकूनी ओझे.”
त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेता स्वप्नील जोशी याने “कडक,” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर अनेक चाहते देखील त्याच्या या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या एका चाहत्याने “कातिलाना आंखे,” अशी कमेंट केली आहे.
सुबोध भावेच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘विजेता’, ‘भयभीत’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘तुला पाहते रे’, ‘का रे दुरावा’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…