कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. पण त्यांच्या करिअरमध्ये एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्याने कलाकारांना इतकी ओळख मिळते की, ते आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’. या मालिकेत मुख्य भूमिकेत मयुरी देशमुख ही अभिनेत्री होती.
तसं पाहायला गेलं, तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांच्या खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Marathi actress mayuri Deshmukh share her stylish look viral on social media)
मयुरीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबत तिने कानात ड्रेसला मॅचिंग गुलाबी रंगाचे ईअरिंग घातले आहेत. तिने तिचे केस सेमी कर्ल केले आहेत. त्यामुळे तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “किसी की नजर ना लगे” तर आणखी एका चाहत्याने “देशमुख सरकार “अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते देखील या लूकवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम