बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. मुलगा तैमुर आणि पती सैफ अली खानसोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर करीना कपूरचा चाहता वर्गही खुप मोठा आहे. परंतु यावेळी मात्र करीना कपूरला तिच्या एका व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिच्या वागण्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया.
नुकताच करीना कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना कपूर सुरक्षा रक्षकांशी उद्धटपणे वागताना दिसून येत आहे. हे पाहून नेटकरी चांगलेच संतापलेले आहेत. (bollywood actress kareena kapoor khan troll due this attitude video viral)
या व्हायरल व्हिडिओमधे करीना कपूर तिच्या बंगल्यातून बाहेर येताना दिसत आहे. तिच्या हातात कॉफीचा कप आहे. ती सुरक्षा रक्षकासमोर येताच, तो तिला आदराने सॅल्युट करतो. परंतु करीना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. इतकेच नव्हे, तर ती त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता तशीच पुढे निघून जाते.
करीनाच्या या वागण्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘उद्धट’ बाई, ‘गर्विष्ठ काकू’, ‘इंग्रजांच्या काळातील वागणूक’, अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया यावर उमटत आहेत. एका चाहत्याने. तर “एवढा गर्व बरा नव्हे, त्यांच्या मुळेच तुम्ही सुरक्षित वावरू शकता” अस सांगत करीनाला खडेबोल सुनावले आहेत.
दरम्यान करीना कपूर आणि ट्रोल हे प्रकरण काही नवीन नाही. यापुर्वी बर्याच वेळा तिला अशा प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. मध्यंतरी सीतेचा रोल करण्यासाठी तिने मागितलेल्या मानधनावरूनही तिला अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले होते. एका चित्रपटात सीतेची भूमिका करण्यासाठी करीनाने १२ कोटी रुपये मानधन मागितल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे करीना कपूरला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यानंतर या भूमिकेसाठी कंगना रणौतची निवड करण्यात आली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’