‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोमधून एक गोड आवाजाची गायिका प्रसिद्ध झाली. केवळ गाण्यापुरते मर्यादित न राहता तिने अभिनयात देखील तिचे कौशल्य दाखवले आहे. हो अगदी बरोबर ओळखलंत! ही गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी केतकी माटेगावकर. केतकीच्या अभिनयाचा प्रवास ‘शाळा’ या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर ती अभिनयात आणि गायनात प्रगतीच करत राहिली. अनेक मालिकांसाठी तिने शीर्षक गीते गायली आहेत. तसेच अनेक चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
केतकीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स घातले आहेत. तसेच पायात हाय हील्स घातले आहेत. तिने सगळे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. (Ketaki mategaokar share her morden look on social media)
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कोणाच्या तरी आयुष्यातील रंग बना.” तिचा हा मॉर्डन लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “लय भारी,” अशी कमेंट केली आहे. आणखी एक चाहता “तुझा नवीन चित्रपट कधी येणार आहे,” असे विचारत आहे.
केतकीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘बालगणेश’, ‘तानी’, ‘टाईमपास २’, ‘वाय झेड’, ‘फोटोकॉपी’, ‘प्रेम हे’, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील गाण्यांना तिचा आवाज दिला आहे. तसेच तिने ‘वैदेही’ या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे.
केतकीला २०१२ साली ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म एँड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. याव्यतिरिक्त ‘टाईमपास’ मधील प्राजूच्या भूमिकेमुळे देखील ती घराघरात पोहोचली. यासोबत ती ‘तानी’, ‘फुंतरू’, ‘आरोही गोष्ट तिघांची’, ‘टाईमपास २’ या चित्रपटात झळकली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा