Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘या’ लक्झरी क्रूझमध्ये पार्टी करत होता किंग खानचा मुलगा, एका रात्रीचा रेट ऐकून फिरतील तुमचेही डोळे

‘या’ लक्झरी क्रूझमध्ये पार्टी करत होता किंग खानचा मुलगा, एका रात्रीचा रेट ऐकून फिरतील तुमचेही डोळे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांची चौकशी झाली. यातच एनसीबीच्या हाती अंमली पदार्थांचे धागेदोरे लागत गेले. गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीला अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अंमली पदार्थांचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

सामान्यतः लाईमलाईट पासून दूर राहणारा आर्यन खान, अलीकडेच एका क्रूझ पार्टीचा भाग बनला, जिथे त्याला एनसीबीने अंमली पदार्थांचे सेवन केल्याबद्दल अटक केली. एनसीबीने त्याला सध्या एक दिवसाच्या कोठडीत ठेवले आहे. आर्यन खान आपल्या वडिलांप्रमाणे आलिशान आयुष्य जगतो. नुकताच तो ज्या क्रूझमध्ये पार्टीमध्ये सामील झाला होता, ते एखादे साधेसुधे जहाज नव्हते, तर त्यात अनेक सुविधा होत्या. या जहाजात पार्टी करण्याचा किंवा रात्र घालवण्याचा खर्चही खूप जास्त आहे. (aryan khan drug case arrest by ncb shahrukh khan son cruise one night price details)

ही क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. ज्याचे नाव Cordelia Cruises आहे. क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये पार्टी करण्यासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. म्हणूनच याचा आनंद घेतल्यानंतर प्रवासी हा प्रवास दीर्घकाळ लक्षात ठेवतात.

या क्रूझमध्ये तुम्हाला फूड पॅव्हेलियन मिळेल आणि ३ खास रेस्टॉरंट्स असतील. या क्रूझमध्ये फिटनेस सेंटरही आहे. इतकेच नव्हे, तर यामध्ये स्पा आणि सलून देखील आहेत. या जहाजामध्ये एक कॅसिनो आणि एक थिएटर आहे. शिवाय यात एक जलतरण तलाव देखील आहे. सोबतच नाईट क्लब, एक लाईव्ह बँड आणि डीजे याठिकाणी उपलब्ध आहे.

आता क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या आहेत, तर त्याचे पॅकेज देखील थोडे महाग असणे साहजिकच आहे. कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७,७०० पासून सुरू होते. हा एका रेट रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३,१०० रुपये आहे. यामध्ये केवळ दोन लोक सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, दोन रात्रींसाठी हाय सी पॅकेज दोन लोकांसाठी ३५, ४०० रुपये आहे.

कॉर्डेलिया क्रूझची सुरुवात भारतामध्ये १८ सप्टेंबर २०२१ झाली आहे. तसेच, पुढील वर्षापासून ही क्रूझ श्रीलंकेसाठी सेवा सुरू करणार आहे. आर्यन खान प्रकरणात एनसीबी टीम देखील या क्रूझवर गेस्ट म्हणून पोहचली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा