बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीने अटक केले आहे. याबाबत सोमवारी (४ ऑक्टोबर) कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात आर्यन खान आणि त्यांच्या मित्रांची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. पुढील तीन दिवस एनसीबी त्यांची कसून चौकशी करणार आहे.
सुनावणी करतेवेळी एनसीबीला आर्यनच्या मोबाईलमध्ये काही हैराण होणारे फोटो मिळाले. तसेच यातून अनेक माहिती समोर आली आहे. यामुळेच त्याची कस्टडी वाढली. एनसीबीने सांगितले की, क्रुझ पार्टीचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी संबंध आहे. यासोबत हे देखील सांगितले की, अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी ते एक सांकेतिक शब्द वापरतात. हे पाहून सरकारी वकिलांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. (Aryan Khan and his friends custody increased till 7 th October in drug case)

या सुनावणी दरम्यान आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे आर्यनचा बचाव करताना म्हणाले की, “तपासणी दरम्यान आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळाले नाही. त्या पार्टीला त्याला केवळ पाहुणा म्हणून बोलावले होते.” त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे देखील कोर्टात हजर होते. सतीश मानेशिंदे हे एक नामांकित वकील आहे. त्यांनी बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांच्या केस लढल्या आहेत. त्यामुळे आर्यनच्या कुटुंबाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
कोर्टाच्या सुनावणी आधी एनसीबीने सगळ्या आरोपींना जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेले होते. जिथे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तसेच त्यांचे मेडिकल चेकअप देखील झाले. रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच तेथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…










