Wednesday, March 11, 2026
Home साऊथ सिनेमा कोट्यवधींची पोटगी नाकारणाऱ्या आणि आजची टॉपची अभिनेत्री असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी नव्हते जेवणासाठी, अभ्यासासाठी पैसे

कोट्यवधींची पोटगी नाकारणाऱ्या आणि आजची टॉपची अभिनेत्री असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी नव्हते जेवणासाठी, अभ्यासासाठी पैसे

सध्या टॉलिवूड अभिनेत्री समंथा तिच्या आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे समंथा. घटस्फोटासोबतच तिने नागाकडून घटस्फोटासाठी मिळणारी २०० कोटी रुपयांची रक्कम नाकारली आणि समंथाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. आज समंथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे जरी काम करत असली तरी तिची फॅन फॉलोविंग संपूर्ण जगात आहे. तिला मिळालेलं हे एवढे मोठे यश अतिशय मेहनत आणि संघर्षाने तिने मिळवले आहे.

एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले होते, तेव्हा ती म्हणाली होती की, “मी आधीपासूनच अभ्यासात हुशार होती. नेहमी माझ्या वर्गात इंटरमीडिएट पर्यंत पहिली आली. पण माझ्या कुटुंबाकडे माझ्या पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. मग अशा परिस्थितीत मी पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात केली. त्यातच एक मॉडेलिंग होते.” समंथाने सांगितले की, मॉडेलिंग करता करता तिला ‘ये माया चेसावे’ चित्रपटाची ऑफर आली होती. आणि त्यानंतर जे काही घडले तो आज इतिहास आहे. तिच्या ११ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. एकापेक्षा एक भूमिका करत तिने यश मिळवले.

समंथा सांगते की संघर्षाचे दिवस इतके वाईट होते की, मला रोज एका वेळेचे जेवण करावे लागे. यासोबतच आजच्या तरुण पिढीला समंथा असे सांगते की, “एखाद्याने स्वप्न पाहणे थांबवू नये. जर ते साध्य सर्व करू शकले तर कोणतीही व्यक्ती त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकते. समांथा ‘फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजमध्ये, सामंथा ने लिटिल कमांडोची भूमिका केली होती, ज्याच प्रेक्षकांनी खूप भरभरून कौतुक केले होते.

समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या आणि नागाच्या घटस्फोटाची माहिती सर्वांना दिली. मागील बऱ्याच काळापासून त्यांच्या सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चाना उधाण आले होते. अखेर त्या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे फॅन्स खूपच नाराज आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त 

 

हे देखील वाचा