Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केली त्यांच्या ५२० व्या चित्रपटाची घोषणा, ‘या’ बड्या दिग्दर्शकासोबत करणार काम

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केली त्यांच्या ५२० व्या चित्रपटाची घोषणा, ‘या’ बड्या दिग्दर्शकासोबत करणार काम

 

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर हे इंडस्ट्री मधील जेष्ठ कलाकार म्हणून ओळखले जातात. अनुपम खेर यांनी आजपर्यंत तब्बल 500 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. अनुपम खेर यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. म्हणूनच ते सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखले जातात. नुकताच त्यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा त्यांचा 520 वा चित्रपट असणार असून, आणि या चित्रपटाचे निर्माते सूरज बडजात्या सुद्धा तब्बल 6 वर्षानी निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. जाणून घेऊया या संपूर्ण चित्रपटाबद्दल…

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. अनेक मोठमोठ्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे. आजपर्यंत 500 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. नुकताच त्यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली असून, हा त्यांचा 520 वा चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्या या सिनेमाचे नाव ‘उंचाई’ असणार आहे. या ‘उंचाई’ चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या हे सुद्धा तब्बल 6 वर्षांनी इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करीत आहेत.

या सिनेमाची माहिती देताना अनुपम खेर यांनी सुरज बडजात्या यांचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मित्रांनो माझ्या ‘उंचाई’ या ५२० व्या चित्रपटाचा प्रवास सुरू होत आहे. सिनेमातील जिनिअस असलेल्या सुरज बडजात्यासोबत काम करत असून, राजश्री फिल्म्स हा एक आशीर्वाद आहे. मला खरोखर सुरंजकडे या फोटोसाठी याचना करावी लागली. कारण ते कॅमेरा समोर येताना लाजतात. आमच्या ऊंचाईच्या टीमसाठी प्रार्थना करा.” या पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी सुरज यांचा कळप देत असतानाच फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट त्यांनी परिणीती चोप्रा,नीना गुप्ता, बोमण इराणीसह अमिताभ बच्चन यांना ही टॅग केली आहे.

दरम्यान या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सुरज बडजात्या पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भेटीला येत असून, चार मित्रांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. सुरज बडजात्या हे दिग्दर्शन क्षेत्रातील नामांकित व्यक्ति आहेत. यापुर्वी मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है, विवाह, प्रेम रतन धन पायो या सारख्या प्रचंड गाजलेल्या कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या या नव्या चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा