Monday, March 2, 2026
Home मराठी झाला ना पोपट! बिग बॉस करणार होते सदस्यांना त्यांचा मोबाईल परत, पण घडलं भलतंच

झाला ना पोपट! बिग बॉस करणार होते सदस्यांना त्यांचा मोबाईल परत, पण घडलं भलतंच

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक नवीन टास्क पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना देखील या सगळ्या गोष्टी बघताना खूप मजा येत आहे. बिग बॉसने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दर आठवड्याला घरात एक थीम असणार आहे. तशीच बिग बॉसने घरातील तिसऱ्या आठवड्याची टेलिफोन ही थीम घोषित केली. ही थीम अत्यंत मजेशीर आणि सदस्यांची उत्कंठा वाढवणारी आहे. तसेच आठवड्यातील नॉमिनेशन कार्य देखील यावर झाले आहे.

बिग बॉसच्या घरात सुरुवातीला टेलिफोन वाजतो, तेव्हा सगळे खूपच गोंधळून जातात की, आवाज नक्की कोठून येत आहे. नंतर सगळे बाहेर येतात, तेव्हा त्यांना समजते की, हॉलमध्ये एक टेलिफोन ठेवला आहे. तसेच बिग बॉस देखील घोषणा करतात की, या आठवड्याची थीम टेलिफोन असणार आहे आणि जेव्हा फोन वाजेल, तेव्हा काहीतरी मजेशीर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर घरात पुन्हा एकदा फोन वाजतो, तेव्हा तो फोन जय उचलतो. (Bigg Boss Marathi 3 : bigg Boss returned contestant mobile, everyone surprise after seeing mobile )

त्यावेळी समोरून बिग बॉसचा आवाज येत असतो. बिग बॉस त्याला सांगतात की, “घरातील सगळ्या सदस्यांना त्यांचा मोबाईल परत मिळणार आहे.” ही बातमी ऐकून जय खूपच खुश होतो. सगळेजण त्याला काय झाले असे विचारतात तेव्हा तो सांगतो की, “बिग बॉस आपल्याला आपले फोन परत देणार आहेत.” यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. त्यावेळी जय शप्पथ घेतो आणि सांगतो की, “मी हेच ऐकलं.” त्यावेळी मात्र घरातील सदस्यांना खूप आनंद होतो. बिग बॉसच्या घरात मोबाईल आणण्यास सक्त मनाई असताना बिग बॉस आपल्याला मोबाईल कसा काय देत आहेत. असा सगळ्यांना प्रश्न पडतो.

काही वेळानंतर बिग बॉसचे या आठवड्यातील टास्कचे पुस्तक आणि सामग्री येते, तेव्हा बिग बॉसने पुठ्याचे मोबाईल बनवून त्यावर प्रत्येक सदस्यांचा फोटो असतो. हे पाहून मात्र सगळेजण नाराज होतात आणि आपण कसा विचार करत होतो हे आठवून सगळेच हसतात. तसेच यावरच या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य झाले आहे. प्रत्येक सदस्याच्या गळ्यात दुसऱ्या सदस्याचा फोटो असणारा मोबाईल असतो. तसेच गार्डनमध्ये एक चार्जिंग बूथ ठेवलेले असते. जेव्हा बजर वाजेल, तेव्हा सदस्यांना येऊन मोबाईल चार्जिंगला लावायचा असतो. परंतु ज्या सदस्याचा मोबाईल चार्जिंगला लावला जाणार नाही, तो या आठवड्यात नॉमिनेट असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड

-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज

-तुटलेलं नातं पुन्हा जुळणार? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारने मारली स्नेहाला मिठी

हे देखील वाचा