Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड मेटॅलिक ड्रेसमध्ये मलायकाने केली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट; ‘या’ गोष्टीशी होतेय अभिनेत्रीची तुलना

मेटॅलिक ड्रेसमध्ये मलायकाने केली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट; ‘या’ गोष्टीशी होतेय अभिनेत्रीची तुलना

बॉलिवूडमध्ये फोटोशूटची किती क्रेझ आहे, याबद्दल सांगणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. बॉलिवूडमधील किंबहुना संपूर्ण मनोरंजन क्षेत्रातील कलाकार सतत वेगवेगळ्या वेषभूषेतले, वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करत असतात आणि त्यातले काही फोटो ते सोशल मीडियावर शेअर देखील करतात. कधी कधी कलाकारांचे हे फोटोशूट खूपच सुंदर तर कधी कधी हे फोटोशूट विचित्र असते. कलाकार जेव्हा ह्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात तेव्हा त्यावर नेटकऱ्यांचा एकापेक्षा एक कमेंट्स येतात.

कलाकार वेगवेगळ्या थीमवर जेव्हा फोटोशूट करतात तेव्हा त्या थीमसोबत कलाकारांचे कपडे देखील इंटरनेटवर चर्चेचा विषय बनतात. बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोराने देखील नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे. या फोटोशूटवर एकीकडे तिचे कौतुक होत असताना दुसरीकडे तिला तिच्या ड्रेससाठी ट्रोल केले जात आहे.

मलायका नुकतेच एका सिल्वर रंगाच्या मेटॅलिक बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. मेनका हरिसिंघानी यांनी डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये मलाईकाचा ग्लॅमर्स अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मलायकाच्या या मिड लेंथ ड्रेसला प्लंजिंग नेकलाइन, पेपलम स्टाइल, रफल फीचर अधिक आकर्षक आणि ट्रेंडी करत आहे. स्टाइलिश टॉप आणि फ्रंट स्लिट ड्रेसमध्ये मलायका तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या ड्रेसवर मालयकाने केलेल्या मेकअपबद्दल सांगयचे झाल्यास तिने तिच्या मॉडर्न ग्लॅम लूकवर सिल्वर आयलायनर, बीच वेबी हेयर्स, लाइट ब्राउन लिप शेडने पूर्ण केले असून, या मेकअपमुळे तिचा लूक सेटल दिसत आहे.

या संपूर्ण लूकवर तिच्या कॅनडिड पोज चार चाँद लावत आहे. हे फोटो पाहून आपल्या लक्षात येईल की, ती तिचे सर्वच लूक किती आत्मविश्वासाने आणि स्टाईलने कॅरी करते. तिचे हे फोटो पाहून तिला सर्वात स्टायलिश का म्हटले जाते याचे उत्तरही अनेकांना मिळेल. मलायकाच्या या फोटोनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे तिला तिच्या या फोटोंवरून ट्रोल देखील करण्यात येत आहे. अनेकांनी तिच्या या ड्रेसची तुलना फॉयल पेपरसोबत केली आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा