Monday, March 2, 2026
Home अन्य लकी अली आजही ‘लकी’ ठरतोय! करोडोंमध्ये मिळतायत ‘या’ गाण्याला हिट्स

लकी अली आजही ‘लकी’ ठरतोय! करोडोंमध्ये मिळतायत ‘या’ गाण्याला हिट्स

बॉलिवूड नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी बेभरवशाची इंडस्ट्री आहे. या क्षेत्रातले अनेक चांगले कलाकार आज गुमनामींचे जीवन व्यतीत करत आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेवढे यश मिळवता त्यापेक्षा कमी जरी अपयश आले तरी तुम्ही हळू हळू मागे पडू लागतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप कमी वेळात न भूतो न भविष्यती असे यश पाहिले आणि तितक्याच लवकर ते या इंडस्ट्रीमधून गायब देखील झाले. याचे चांगले उदाहरण म्हणजे गायक लकी अली.

नुकताच लकी अली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लकी ‘ओ सनम’ हे गाणे गात आहे. हा व्हिडिओ एखाद्या कार्यक्रमातील दिसत असून आमिर अली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दोन लाख लोकांनी पाहिला असून, त्यावर अनेक लोकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. लोकांच्या कमेंट्स वाचून अजूनही लोकं लकी अलीला विसरले नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कॉपीराईटचा फारसा परिणाम होणार नसल्याने अनेक चाहत्यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअऱ केला आहे. ६२ वर्षांचे लकी अली यात ‘ओ सनम’ गाणे गाणताना हरवुन गेलेले दिसत आहेत. वय जरी थोड जास्त झालं असलं तरी त्यांच्या आवाजातील मादकता मात्र यत्किंचीतही कमी झालेली दिसत नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील लकी अली यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील होता. अनेक तरुण-तरुणी लकी अलीभोवती बसले आहेत आणि तो गिटार हातात घेऊन ‘ओ सनम…’ हे गाणे गात आहे.

लकी अली हा प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडीचे बादशाह मेहमूद यांचा मुलगा आहे. लकी अली हे फक्त गायक नसून ते अभिनेते, लेखक आणि संगीतकार सुद्धा आहेत. १९ सप्टेंबर १९५८ ला लकी यांचा जन्म झाला. नऊ भावंडांमध्ये लकी दुसऱ्या नंबरचे. वडिलांप्रमाणे लकी यांनी देखील अभिनय करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी मेहमूद यांचे दिग्दर्शन असलेल्या आणि १९६२ साली आलेल्या ‘छोटे नवाब’ सिनेमात अभिनय करत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. मध्ये बऱ्याच काळ ते अभिनयापासून दूर होते. मग त्यांनी ‘कांटे’ या सिनेमातून पुन्हा अभिनयात पाऊल ठेवले. पण त्याला अभिनयात पाहिजे तितके यश मिळाले नाही.

अभिनयासोबतच त्यानी गायनाला देखील सुरुवात केली. ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटातील ‘नशा नशा’ या गाण्याने त्यांनी त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘कहो ना प्यार हैं’ चित्रपटात ‘एक पल का जीना’, ‘ना तुम जानो ना हम’ ही दोन गाणे गेली आणि लकी प्रचंड प्रकाशझोतात आले. मात्र असे असूनही इथे देखील त्यांची निराशा झाला. ‘आ भी जा’, ‘हैरात’ आणि ‘सफरनामा’ अशी उत्कृष्ट गाणी गाऊनही लकी अपयशी ठरले.

लकी यांचे खाजगी जीवनही खूप चढ उतारांनी भरलेले होते. लकी यांना त्यांच्या वैवाहिक जीवनातही यश मिळाले नाही. त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केले. पहिल्या दोन लग्नांमध्ये त्याचा घटस्फोट झाला. लकी यांचे पहिले लग्न मेघन जेन मकक्लियरी ह्यांच्यासोबत झाले. त्यांनी लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन आणि लकी यांना दोन मुले झालीत. पण नंतर त्यांचा काही कारणांमुळे घटस्फोट झाला. मग लकी यांनी इनायासोबत दुसरे लग्न केले. इनायापासूनही त्यांना दोन मुले झालीत. मात्र येथेही ते अपयशी झाले आणि त्यानी घटस्फोट घेतला. त्यानंतर लकी यांनी २०१० मध्ये तिसरे लग्न आयशा सोबत केले. या लग्नांतून त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. आयशा ह्या मिस ग्रेट ब्रिटन असून आता त्या मुंबईत मॉडेलिंग करतात.

हे देखील वाचा