अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईत या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. दरम्यान न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.
याचा परिणाम शाहरुख खानच्या कामावरही पडलेला दिसून येत आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. लर्निंग ऍप बायजूसच्या एड-टेक चीफने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, बायजूसने अभिनेत्याच्या सर्व जाहिराती बंद केल्या होत्या, ज्यासाठी त्याने बुकिंग केली होती. (aryan khan drug case jolt for shahrukh khan byju bans all advertisements)
बायजूस हा शाहरुख खानसाठी सर्वात मोठ्या स्पॉन्सरशीप डीलपैकी एक होता. त्याचवेळी अभिनेता हुंडाई, एलजी, दुबई टुरिझम, आयसीआयसीआय आणि रिलायन्स जिओ सारख्या अनेक कंपन्यांचा चेहरा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, बायजूस शाहरुख खानला ब्रँडची जाहिरात करण्यासाठी वर्षाला ३-४ कोटी रुपये देते. शिवाय तो २०१७ पासून या ब्रँडचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे. मात्र कंपनीने अभिनेत्याला त्यांचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून पूर्णपणे काढून टाकले आहे की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
आर्यन खान आणि इतर ७ जणांना गेल्या आठवड्यात मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर अं’मली पदार्थाच्या पार्टीमध्ये पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने केलेल्या छाप्यांमध्ये १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि ५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत
-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा










