टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम करणाऱ्या जवळपास सर्वच अभिनेेत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचणाऱ्या या अभिनेत्री पारंपारिक लूकसोबतच हॉट आणि बोल्ड फोटोही शेअर करताना दिसतात. काही अभिनेत्रींनी तर आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊन आपली बॉडी एकदम जबरदस्त बनवली आहे. त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचे वयही जास्त असल्याचे दिसून येत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘कसोटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारी. जिच्याकडे बघून कोणाला समजणार देखील नाही की, ती एका मुलीची आहे. मालिकेत साडी आणि सूटमध्ये दिसणारी श्वेता सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
श्वेताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. सोबतच तिने पायात लाल रंगाचे सॅंडल घातले आहेत. तिने सगळे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. तसेच पहिल्या फोटोमध्ये पाहिलं, तर ती गार्डनमध्ये ग्रासवर बसलेली दिसत आहे. ती कॅमेराकडे बघून पोझ देताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती उभी राहून झाडासोबत पोझ देत आहे. (Actress shweta tiwari share her photos on social media)
हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “त्यांना माझा खूप राग येतो, तरी देखील ते दररोज माझे पेज चेक करतात.” तिच्या या फोटोसोबत तिचे कॅप्शन देखील अनेकांना आवडले आहे. या फोटोवर सारा खानने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच राहुल वैद्यने “तू कोणत्या मुलीबाबत बोलत आहेस,” अशी कमेंट केली आहे. यासोबत तिचे चाहते देखील या फोटोवरवर कमेंट्चा वर्षाव करत आहेत.
याआधी देखील श्वेताने पिवळ्या रंगाचा एक ग्लॅमरस ड्रेस घालून फोटोशूट शेअर केले होते. तिच्या या फोटोंना देखील जोरदार प्रतिसाद मिळाला होता. श्वेता या आधी ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये दिसली होती. तसेच ती ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभागी झाली होती. यासोबत तिने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा










