Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘डान्स पे चान्स’ टास्क अयशस्वी, या आठवड्यातगी ‘बिग बॉस मराठी’चे घर राहणार कॅप्टनविना

‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका पेक्षा एक जबरदस्त टास्क होत आहेत. घरातील सदस्य देखील हे सगळे टास्क एन्जॉय करताना दिसत आहेत. घरात प्रत्येक टास्कमध्ये राडे आणि भांडणं होत असतात. मात्र, या आठवड्यात बिग बॉसने एक टास्क दिला, जो सदस्यांनी मनापासून एन्जॉय केला तसेच घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. अशातच घरात बिग बॉसने ‘डान्स पे चान्स’ हे कॅप्टन्सी कार्य सोपवले आहे. हा टास्क करताना सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होतो.

या आठवड्यात टीम ‘ए’ विजयी झाल्यानंतर जय आणि विशाल यांचे कॅप्टन पदासाठी एक मताने नाव सुचवण्यात आले. त्यावेळी घरातील सदस्यांना गार्डनमधील प्लॅटफॉर्मवर डान्स करायचा असतो आणि तो डान्स परफॉर्मन्सवर त्यांच्या आवडत्या सदस्याच्या ऍपवर अपलोड करायचा असतो.

यावेळी बिग बॉसने घरातील सदस्यांच्या जोड्या लावून करून दिलेल्या असतात. (Bigg Boss Marathi 3 : dance pe chance task is unsuccessful)

बिग बॉसने जे गाणे दिलेले असते त्याच गाण्यावर सदस्यांना डान्स करायचा असतो. यावेळी घरातील सगळे सदस्य एकदम जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करतात. डान्स सगळेच खूप एन्जॉय करताना दिसतात. यावेळी एक मताने केवळ एक-एक मत जय आणि विशालच्या खात्यात येते. त्यामुळे कोणीही जिंकत नाही आणि नाईलाजाने बिग बॉस हे कॅप्टन पद रद्द करतात आणि या आठवड्यात देखील घरात कोणीच कॅप्टन नसेल हे सांगतात. यामुळे घरातील सगळ्यांचाच हिरमोड होतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, प्रेक्षक लावतायेत अंदाज

-कौतुकास्पद! मराठमोळ्या पूजा सावंतने ‘हे’ महत्त्वाचं अभियान घेतलं हाती, फोटो आले समोर

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा