Thursday, May 14, 2026
Home बॉलीवूड बोल्डनेसचा कहर, ईशा गुप्ताने बाल्कनीमध्ये उभे राहून केले टॉपलेस फोटोशूट

बोल्डनेसचा कहर, ईशा गुप्ताने बाल्कनीमध्ये उभे राहून केले टॉपलेस फोटोशूट

आजकाल बॉलिवूड स्टार्स आणि सोशल मीडिया हे एक समीकरणचं झाले आहे. प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील घटना सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातच अभिनेत्री ईशा गुप्ता देखील तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्डनेस आणि अभिनयामुळे ती जेवढी चर्चेत असते, तेवढीच चर्चेत ती अजून एका गोष्टीमुळे चर्चेत असते ती गोष्ट म्हणजे तिचा फिटनेस. अशातच तिने तिचे काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.

ईशाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती बाल्कनीमध्ये उभी आहे. तिने केवळ जिन्स घातली असून, तिचा हा फोटो पाठमोऱ्या बाजूने काढला आहे. ज्यात ती टॉपलेस दिसत असून, या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिच्या आजबाजूला हिरवा निसर्ग दिसत असल्यामुळे, ती कुठेतरी फिरायला गेली आहे असा अंदाज फॅन्स लावत आहेत. (Isha Gupta share her topless photos on social media)

तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण ह्या व्हिडिओवर हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत असून, तिचे हे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. याआधी देखील ती तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे अनेकवेळा ती ट्रोल देखील झाली आहे. अनेकांना तिचा हा बोल्ड अंदाज आवडत नाही. त्यामुळे तिच्यावर अनेकवेळा टीका करतात.

ईशा गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘जन्नत 2’, ‘रेस 3’, ‘रुस्तम’, ‘कमांडो 2’, ‘बादशाहो’, ‘टोटल धमल’, ‘हमशक्ल’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली आहे. बॉलिवूडमध्ये ती जरी खूप यशस्वी झाली नसली तरी तिने तिची एक वेगळीच छाप निर्माण केली आहे.

ईशा मागच्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिला तिच्या रंगावरून लहानपणी कसे चिडवले जायचे याबद्दल तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. लहान असताना तिला तिचे मित्र, नातेवाईक, शेजारचे ‘काली माँ’ नावाने चिडवायचे. मात्र तिने कधीच हे चिडवणे मनावर घेतले नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा