नेटफ्लिक्सवर दक्षिण कोरियन शो आला आहे, ज्याचे नाव आहे ‘स्क्विड गेम’. हा शो प्रचंड लोकप्रिय होत असून,‘स्क्विड गेम’ एक प्रकारचा खेळ आहे. सीरिजच्या कथेमुळे प्रेक्षकांना हा शो खूपच आवडत आहे. या चर्चेत असणाऱ्या मालिकेत कोरियन कलाकारांसोबतच एक भारतीय चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा भारतीय चेहरा अभिनेता अनुपम त्रिपाठीचा. जर हॉलीवूडमध्ये भारतीय स्टार्स दिसतात, तर त्यांना आपण एक मोठी उपलब्धी मानतो. अशा परिस्थितीत जर एखादा भारतीय कलाकार दक्षिण कोरियाच्या सीरिजमध्ये दिसला आणि त्याची चर्चा झाली नाही, असे होणे शक्यच नाही. या लेखातून जाणून घेऊया अनुपम त्रिपाठी आहे तरी कोण?
दिल्लीमध्ये जन्मलेला अनुपम त्रिपाठी कोरियाचा बेस्ट अभिनेता आहे. ‘स्क्विड गेम’च्या आधी त्याला क्वचितच कोणी ओळखत होते. या सीरीजनंतर, अनुपम एका रात्रीत जगभरात प्रसिद्ध झाला. कोरियन कलाकारांमध्ये हिंदी बोलत असणाऱ्या अनुपमबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान अनुपमला संगीताची विशेष आवड निर्माण झाली होती. पण स्टेज निर्मिती ‘स्पार्टाकस’ने त्याचे नशीब इतरत्र वळवले. २००६ ते २०१० पर्यंत, अनुपम हा बहुरूप थिएटरचा भाग होता. भारतात अभिनयात करिअर करण्याची संधी असताना तो कोरियाला का गेला. हे जाणून घेऊया.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अनुपमने सांगितले की, त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अर्ज करायचा होता. मग एके दिवशी त्याच्या एका मित्राने सांगितले की, कोरिया मेजर एशियन स्कॉलरशिप ही कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशासाठी उघड झाली आहे. ही शिष्यवृत्ती अनुपमसाठी सुवर्णसंधी होती. अनुपम परीक्षा उत्तीर्ण झाला आणि २०१० मध्ये पदवीपूर्व कार्यक्रमात सामील झाला. सुरुवातीला अनुपमला तिथल्या भाषेचा त्रास होत होता, पण हळूहळू तो दोन वर्षात कोरियन भाषेत पारंगत झाला.
पदवीनंतर अनुपमने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले. यामध्ये ‘ओड टू माय फादर’, ‘डेसेंडेंट ऑफ द सन’, ‘स्पेस स्वीपर’ यांचा समावेश आहे. अभिनयादरम्यान, त्याने पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली. जानेवारी २०२० मध्ये जेव्हा अनुपम दक्षिण कोरियाला गेला तेव्हा कोरियन कास्टिंग एजन्सीने त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ऑडिशन दिले आणि मग अनुपमची स्क्विड गेमसाठी निवड झाली. त्याने सीरिजमध्ये पाकिस्तानी स्थलांतरिताची भूमिका साकारली असल्याने त्याला पाकिस्तानी स्थलांतरितांचे व्हिडिओ पाहून आणि उर्दू भाषेवर काम करावे लागले.
मुलाखतीत अनुपमने आपल्या यशाबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, “आम्हाला माहित होते की, याला चांगला प्रतिसाद मिळेल, पण ती एक सेंसेशन बनेल, याची कोणालाही अपेक्षा नव्हती, मी तर त्यासाठी तयारही नव्हतो.” अनुपम पुढे म्हणाला, “१७ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ४ पर्यंत माझे आयुष्य ठीक होते, पण संध्याकाळी ५ नंतर ते खूप मोठे झाले, अचानक प्रत्येकाने मला मेसेज करायला सुरुवात केली आणि फक्त ‘अली’ ‘अली’ मेसेज येत होते.”
अनुपम ‘स्क्विड गेम’ वेब सिरीजमध्ये ‘अली’ या पाकिस्तानी प्रवासीची भूमिका साकारत आहे. तो उदरनिर्वाहाच्या शोधात पत्नी आणि मुलासह दक्षिण कोरियाला आला येतो. तो काम करतो मात्र त्याला त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत, ज्यामुळे अलीला घर चालवणे अवघड होते. त्याच्या असहायतेमुळे अली गेममध्ये जाण्यास तयार होतो. अनुपमने सीरिजमध्ये उत्तम काम केले आहे. अलीच्या चेहऱ्यावर असणारी हतबलता आणि दयाळूपणाची भावना प्रभावीपणे दिसून येते. तो प्रामाणिक आणि निर्दोष देखील आहे. पण ‘अली’ स्वतः फसवणुकीचा बळी ठरतो आणि आपला जीव गमावतो.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे