मंडळी आपण नेहमीच बॉलिवूड अभिनेत्रींच्या व्हायरल फोटोज आणि व्हिडिओबद्दल चर्चा करत असतो. त्यांच्या बारीक बारीक गोष्टींवर नजर ठेवून असतो. परंतु आपल्याला सांगायला आवडेल की या सगळ्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रीदेखील काही मागे राहिलेल्या नाहीत.
त्यासुद्धा त्यांचे हॉट, बोल्ड तर कधी पारंपारिक वेशभूषेतले स्वतःचे फोटोज सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करत असतात. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच यांचेही लाखो फॉलोअर्स सोशल मिडियावर आहेत आणि नेहमीच हे चाहते या अभिनेत्रींना प्रोत्साहन देत असतात. अशाच एका मराठी सौंदर्यवतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला पाहुयात.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने, नृत्याविष्काराने स्थान मिळवणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच तरुणाईचं आकर्षण राहीली आहे. अनेकदा तिचे फोटोज आणि व्हिडिओज हे व्हायरल होत असतात. तसेच ती तरुणांमध्ये चर्चेचा विषयदेखील बनत असते. आतासुद्धा तिच्या काही नव्या फोटोंमुळे ती चर्चेत आहे. संस्कृती बालगुडेने इंस्टाग्रामवर तिचं फोटोशूट शेअर केलं आहे. हे फोटो शेअर करताना एका फोटोला कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “जब तुमसे नज़र टकराई सनम, जज़बात का एक तूफ़ान उठा…”
संस्कृती बालगुडेने नवीन फोटोशूटमध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यावर तिने साजेसे असे दागिने परिधान केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमधील तिच्या सौंदर्यांने चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. तिचे या साडीतील फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
संस्कृती बालगुडेचा आगामी चित्रपट ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी मुहूर्त पार पडला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत या चित्रपटामध्ये दिसणार आहे. वैभव जोशी या चित्रपटात गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.
संस्कृती शेवटची ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. तसेच तिने ‘सांगतो ऐका’, निवडुंग, शिव्या, एफयु या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.










