कार्तिक आर्यन हा एक बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतपर्यत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि तो सध्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे चित्रकरण करत होता आणि त्यादरम्याच त्याला दुखापत झाली आहे. कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला दुखापत झाली. आणि त्यानंतर त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर त्याच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि अभिनेता आता घरी विश्रांती घेत आहे. मात्र त्याचे चाहते हे त्याच्या दुखापती मुळे चिंतेत असतील यासाठी कार्तिक आर्यनने शस्त्रक्रियेनंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या गुडघ्याची जखम आणि प्रकृती बाबत त्याने माहीती शेअर केली आहे.
कार्तिक आर्यनने गंमतीने त्याला Break a leg from director Kabir Khan असे कॅप्शन दिले आहे. आणि त्याने काही इंस्टावर फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एक फोटो हा त्याच्या पायाला जखमी झाल्याचा आहे. दुसऱ्या फोटोला त्याने ‘पाय सेवेबाहेर’ असे कॅप्शन दिले आहे. आणि एक फोटो मध्ये तो ब्लॅक शाडो असलेला आणि बहुधा तो फोटो हा मुंबईतील रुग्णालयातील असावा. यात त्याची सावली दिसत आहे. अन् बाकीचे फोटो आणि व्हिडिओ जुने असल्याचे दिसत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या कबीर खानच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि त्या वेळी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यावेळी तो ॲक्शन सीन करत होता त्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याला माहीम येथील फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियानंतर तो आता घरी आराम करत आहे.
हेही वाचा
मिर्झापुर द मुव्ही मधुन रवी किशन आणि सुशांत सिंह यांचे नवे पोस्टर झाले रिलीज










