Tuesday, August 25, 2026
Home बॉलीवूड आकांक्षा चमोलाला झाली दुखापत, शेअर केला या अपघाताचा किस्सा

आकांक्षा चमोलाला झाली दुखापत, शेअर केला या अपघाताचा किस्सा

आकांक्षा चमोला हिचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर सध्या व्हायरल होत आहे. त्यात असे दिसुन येत आहे की तिच्या पायाला दुखापत झाली आहे, आणि तिचे चाहते तिला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर लक्ष वेधुन घेत आहे. तर पापाराझींशी बोलताना तिने सांगितले की, तिच्या गुडघ्याला आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. तिने गंमतीने पुढे सांगितले जास्त दुखापत झाली नाहीय हि किरकोळ दुखापत आहे. आणि हि दुखापत तिला घरीच झाली आहे. आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने गौरव बाबत बोलताना दिसली आहे. 

जेव्हा पापारझीनी आकांक्षाला विचारले की, हि दुखापत कशामुळे झाली आहे. त्यावेळी तिने गंमतीने म्हणले हे घरी स्टंट करत असताना घडले आहे. व्हिडिओमध्ये दिसुन येते की तीने सुंदर निळ्या रंगाचा शाॅर्ट ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची हिल्स घातली आहे. तर तिला एवढे लागुन हि ती घराबाहेर पडली आहे आणि ती काम करत आहे त्यासाठी तिचे चाहते सोशल मीडयावर कौतुक करत आहेत.

तर सोशल मिडीयावर आकांक्षाचा अजुन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तिने गौरव खन्नाबद्दलही भाष्य केले आहे. जेव्हा एक पापाराझीने अभिनेत्रीला सांगितले की बाबुला तुमची आठवण येत आहे. आणि यावर आकांक्षाने म्हणले की, बाबुला माझी आठवण कशी येईल तो तर माझ्या विरोधात मुलाखती देत आहे.

आकांक्षाने ‘लॉक अप 2’ मध्ये गौरव (gaurav)खन्नापासुन विभक्त झाल्याचे सांगितले होते आणि त्यामुळे ती खुप चर्चेत आली आहे. 2016 त्यांनी लग्न केले होते आणि ते जवळपास 1 वर्षा पासुन वेगळे राहत आहेत. त्यानंतर तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. मात्र त्यांनी अद्याप कागपत्रांवर स्वाक्षरी केली नाही.

हेही वाचा

मिर्झापुर द मुव्ही मधुन रवी किशन आणि सुशांत सिंह यांचे नवे पोस्टर झाले रिलीज

हे देखील वाचा