Saturday, September 21, 2024
Home मराठी फोटोवर यूजरने केली ‘अशी’ कमेंट, पाहून स्वत:ला रोखू शकली नाही अमृता; प्रत्यूत्तर देत म्हणाली…

फोटोवर यूजरने केली ‘अशी’ कमेंट, पाहून स्वत:ला रोखू शकली नाही अमृता; प्रत्यूत्तर देत म्हणाली…

 

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध नाव बनली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि फॅशन स्टेटमेंटसाठी बरीच चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या सुंदरतेसाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज देखील चाहत्यांना चांगलाच भावतो. मात्र यावेळी एका युजरने अशी काही कमेंट केली, जी पाहून अभिनेत्रीनेही त्याला चांगलंच सुनावलं आहे.

अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हे ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहेत, ज्यात अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने न्यूड मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. या ग्लॅमरस लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक करून अभिनेत्री हॉट स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

या फोटोमधील अमृताच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. म्हणूनच बघता बघता फोटोवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या फोटोवर हजारो युजर्सने लाईक केले आहे. तर याचवेळी कमेंट करत युजर म्हणाला की, “मॅडम कपडे घालून सुद्धा फोटो छान येतात.” ही कमेंट पाहून अभिनेत्री स्वतःला रोखू शकली नाही आणि तिने लगेचच याला प्रत्युत्तर दिलं. त्या कमेंटला रिप्लाय देत अमृता म्हणाली की, “मग कपडे घातले नाहीत, असं वाटतंय का तुम्हाला?” अभिनेत्रीचे हे फोटो आणि हे प्रत्युत्तर आता सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अमृताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काळात सचिन कुंडलकरच्या ‘पॉंडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. तसेच अभिनेत्रीने ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांतून बॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा