Wednesday, March 18, 2026
Home मराठी जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी रहस्यमयी मृत्यू, अजूनही जगासमोर आले नाही मृत्यूचे कारण

जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी रहस्यमयी मृत्यू, अजूनही जगासमोर आले नाही मृत्यूचे कारण

गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये जगभरात कोव्हीड १९ या आजाराने हैदोस घातला. या आजाराच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील विविध देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला. आपल्या भारतात तर जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जास्त कालावधीसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता. यामुळे अनेक जण घरात बंदिस्त झाले. जे एकटे होते ते जास्त काळ घरात एकटेच असल्यामुळे नैराश्याचे शिकार होऊ लागले. काहींनी तर आत्महत्या केली. आपल्याकडे मागच्या वर्षी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याचं मृत्यू प्रकरण खूप गाजलं. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अनेक आरोप झाले. परंतु जरा थांबा हे गूढ मृत्यू काही फक्त भारतातच नाही झाले. गेल्या महिन्यात अमेरिकेतही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री अशाचप्रकारे स्वतःच्याच घरात मृतावस्थेत आढळली. महत्त्वाचं कारण म्हणजे यात अद्यापही या अभिनेत्रीच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही.

अमेरिकन अभिनेत्री जेसिका कॅम्पबेल हिचं गेल्या महिन्यात गूढ परिस्थितीत निधन झालं. तिचा मृतदेह २९ डिसेंबर २०२० रोजी पोर्टलँडच्या घरी सापडला होता. जेसिका अभिनेत्रीसोबतच व्यवसायाने निसर्गोपचार चिकित्सक होती. आश्चर्य म्हणजे जेसिकाच्या मृत्यूच्या इतक्या दिवसानंतरही तिचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलेला नाही.

जेसिकाचं कुटुंब सतत तिच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पोस्टमॉर्टम अहवाल न मिळाल्यामुळे अद्यापही मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. परंतु जेसिकाच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तिला श्वास घेण्यास त्रास होत होता.

जेसिकाची चुलत बहीण सारा वेसलिंग हिने माध्यमांना सांगितले की, ती नेहमीप्रमाणेच तिच्या क्लिनिकमध्ये गेली आणि त्या दिवशी ती तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होती. अशात जेसिका बाथरूममध्ये गेली पण जेव्हा ती परत आली नाही तेव्हा तिची आई काळजीपोटी आत पाहायला गेली तर त्यांच्यासमोर त्यांची मुलगी बाथरूमच्या फरशीवर निपचित पडली होती.

जेसिका अभिनेता रीस विदरस्पूनबरोबर ‘इलेक्शन’ या चित्रपटात दिसली होती. या व्यतिरिक्त तिने काही टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं. पण, तिला अभिनयाच्या विश्वात फारसं यश मिळालं नाही, म्हणून ती डॉक्टर बनली. ती गेली तेव्हा अवघ्या ३८ वर्षांची होती. शिवाय तिला १० वर्षांचा मुलगा ऑलिव्हर आहे.

हे देखील वाचा