Friday, June 20, 2025
Home भोजपूरी नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळाला बोल्ड मोनालिसाचा पारंपारिक अंदाज, पाहा फोटो

नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळाला बोल्ड मोनालिसाचा पारंपारिक अंदाज, पाहा फोटो

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती केवळ चित्रपटांमधून नाव कमावत नाही, तर तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिची फॅन फॉलोविंग सुद्धा खूप जास्त असून, सातत्याने वाढत आहे. मोनालिसा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्रीने पारंपरिक लूकचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे चाहतेही तिचे जोरदार कौतुक करत आहेत. (style of bhojpuri actress monalisa shown on the occasion of navratri see pics)

मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पारंपरिक लूकचे अनेक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “शुभ महा अष्टमी” असे लिहिले आहे. यात तिने हिरव्या रंगाचा लेहंगा घालून त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. तिने या पोशाखासह जड दागिने घातले आहेत, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे. मोनालिसाने गळ्यात हार घालून, बांगड्या आणि बिंदी घातली आहे. एकंदरित यात ती एखाद्या वधूपेक्षा कमी दिसत नव्हती. मोनालिसाचा हा पारंपारिक अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

यादरम्यान मोनालिसाने वेगवेगळ्या पोझही दिल्या, जे तिच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवण्यासाठी पुरेशा आहेत. भोजपुरी व्यतिरिक्त मोनालिसाने बंगाली, कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

-लय भारी! केवळ १२० रिसेप्शनिस्टचा जॉब करणारी मोनालिसा आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-बाबो! अक्षरापासून ते मोनालिसापर्यंत ‘या’ भोजपुरी अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेतात बक्कळ मानधन; पाहा यादी

हे देखील वाचा