Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘मी दही खातच नाही’, म्हणत रितेश देशमुखने मिठाईच्या पोस्टवरून होणाऱ्या ट्रोलिंगला दिले सणसणीत उत्तर

‘मी दही खातच नाही’, म्हणत रितेश देशमुखने मिठाईच्या पोस्टवरून होणाऱ्या ट्रोलिंगला दिले सणसणीत उत्तर

सध्या भारतात सण उत्सव चालू आहेत. सण उत्सव म्हटल्यावर आपल्याकडे मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशातच मिठाईने शरीराला होणारे नुकसान आणि गगनाला भिडलेल्या किंमतींबद्दल बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने एक मजेशीर अंदाजात ट्वीट केले आहे. त्याने केलेले हे ट्वीट हिंदू सणांविरोधात असल्याचे मानत सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. यातच रितेश देशमुखने त्याच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

रितेश देशमुखने ट्विटरवर एका मिठाईच्या प्राईज चार्टचा मेन्यू पोस्ट केला. सणानिमित्त मिठाईचे वाढते भाव आणि मिठाई खाल्यानंतर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे की, “लाडू, जिलेबी, काजू, बर्फी आणि चॉकलेटच्या रेट लिस्टसोबत शेवटी बुद्धीने निवडा” यासोबत त्याने लिहिले आहे की, “मी विचार केला तुम्हाला सतर्क करावे.” (Riteish Deshmukh witty tweet in festivals says sorry I am vegan)

Photo Courtesy twitterritiesh deshmukh

रितेशने शेअर केलेल्या या पोस्टवर एका युझरने विचारले, “तुम्हा लोकांना केवळ सनातनी सणांच्या वेळेस ज्ञान येते का? ईद, क्रिसमस किंवा न्यू ईअर येताच तोंडात दही साठते का?.” युझर्सचा कमेंटवर रितेश अगदी मजेशीर उत्तर दिले आहे. रितेशने लिहिले की, “सॉरी सर, मी व्हेगन‌ आहे. दही नाही खात.” त्याने दिलेले हे उत्तर त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. रितेश देशमुखच्या या उत्तरावर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Photo Courtesy twitterritiesh deshmukh

रितेश देशमुख हा नेहमीच त्याची पत्नी जिनिलियासोबत मजेशीर आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असतो. याची झलक आपण अरबाज खानच्या ‘पिंच २’ मध्ये पाहिली आहे. रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच फरदिन खानसोबत ‘विस्फोट’ चित्रपटात दिसणार आहे. याआधी त्या दोघांनी २००७ मध्ये आलेल्या ‘बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कूकी गुलाटी करत आहेत. यासोबत तो अनेक चित्रपटात दिसणार आहे. याआधी देखील त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

त्याने ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘माउली’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. तसेच त्याने मराठीमध्ये ‘लय भारी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

हे देखील वाचा