Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड अल्पावधीतच यश मिळवलेल्या झायराने अचानक ठोकला इंडस्ट्रीला ‘राम राम’, ‘या’मुळे यायच्या तिला जीवे मारण्याच्या धमक्या

अल्पावधीतच यश मिळवलेल्या झायराने अचानक ठोकला इंडस्ट्रीला ‘राम राम’, ‘या’मुळे यायच्या तिला जीवे मारण्याच्या धमक्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक चित्रपट करतात तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तर दुसरीकडे असेही अनेक कलाकार आहेत, ज्यांना सुपरस्टार बनायला एक दोन चित्रपटच पुरेसे असतात. अशीच एक अभिनेत्री आहे झायरा वसीम. ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वादळासारखी आली आणि तशीच निघूनही गेली. मोजक्या दोन तीन चित्रपटाने, अगदी कमी वयातच झायरा यशाच्या शिखरावर पोहचली होती. मात्र शिखरावर पोहचून तिने अचानक अभिनय क्षेत्राला सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दरवर्षी २३ ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत असते. वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

झायरा वसीम आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात गीता फोगटचं पात्र साकारून रातोरात लोकप्रिय झाली. तिला या पात्रामध्ये खूप पसंत केलं गेलं. झायराला ‘दंगल’मध्ये इतकी पसंती मिळाली की, तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. यानंतर २०१७ मध्ये ती ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती पुन्हा एकदा आमिर खानसोबत झळकली. यात झायरा मुख्य भूमिकेत होती. विशेष बाब म्हणजे, झायराला ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (bollywood zaira wasim celebrating 21st birthday on 23rd october)

आपल्या करिअरमध्ये खूप चांगलं काम करत असताना, झायराने अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिची कारकीर्द फक्त ५ वर्षांची होती. पण या पाच वर्षात तिने दाखवून दिले, की तिला फक्त चांगले चित्रपट करायला आवडतात. तिला स्क्रिप्टचीही समज होती. पण, तरीही लहानपणापासून झायरा सतत चर्चेत आणि वादात राहिली आहे.

इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाने आली चर्चेत
साल २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट रिलीझ झाल्यानंतर, झायराने लगेचच जाहीर केले की ती अभिनय आणि चित्रपट उद्योगापासून स्वत:ला वेगळे करत आहे. ती सोशल मीडियावर म्हणाली की, ती तिच्या कामाबद्दल खूश नाही. कारण ते तिला तिच्या विश्वासापासून दूर नेत आहे. तिने लिहिले होते की, अभिनेत्री असल्यामुळे ती इस्लामपासून दूर होत आहे आणि यामुळेच तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्ट डिलीट केल्यामुळं फुटलं वादाला तोंड
साल २०१७ मध्ये झायराने जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्या फोटोंवरूनही वाद निर्माण झाला होता. मेहबूबा मुफ्ती यांनी झायराला ‘काश्मिरी रोल मॉडेल’ म्हटले होते. यावरून झायराला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. वाद वाढत असल्याचे पाहून, झायराने सोशल मीडियावर माफी मागणारी पोस्ट शेअर केली. पण काही वेळाने ती डिलीट केली. झायराने पोस्ट डिलीट करण्यापूर्वीच ती पोस्ट मीडियाच्या नजरेत आली होती.

शारीरिक शोषणाचा आरोप
साल २०१७ मध्ये झायराने तिच्यासोबत झालेल्या शोषणाची तक्रार केल्यानंतर, ती लाईमलाईटमध्ये आली होती. दिल्लीहून मुंबईला येताना तिने इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट केल्या होत्या. त्यापैकी झायराची तक्रार होती की, एका व्यक्तीने तिला मागच्या सीटवरून अयोग्यपणे स्पर्श केला. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते.

केसांवरूनही झाला होता वाद
साल २०१६ मध्ये, पहिला वाद तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच सुरू झाला. प्रत्यक्षात चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये झायराचे केस कापलेले होते. त्यामुळे कट्टरतावादी मुस्लिमांनी तिला खूप ट्रोल केले होते. झायराला तिचे केस कापण्यासाठी गैर-इस्लामिक असल्याचे म्हटले गेले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय

हे देखील वाचा