Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘मी वर्षात जेवढे पैसे नाही कमवले तेवढे …’, म्हणत महेश भट्ट यांनी केले आलियाचे कौतुक

‘मी वर्षात जेवढे पैसे नाही कमवले तेवढे …’, म्हणत महेश भट्ट यांनी केले आलियाचे कौतुक

बॉलिवूच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट हे नाव प्रकर्षाने घेतले जाते. खूप कमी दिवसात आणि कमी वयात तिने स्वतः च्या नावाला ब्रँड बनवले आहे. चांगल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या आलियाने इंडस्ट्रीमध्ये तिचे मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. बबली गर्ल आलिया सर्वांनाच तिच्या अभिनयाने आणि लुक्सने घायाळ करत असते. तिचे नाव आज टॉप अभिनेत्रींमध्ये सामील आहे. आलियाचे हे यश पाहून तिचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट खूप खुश आहेत. आपल्या मुलीचे एवढे मोठे यश, एवढे मोठे नाव पाहून महेश भट्ट भारावून गेले आहेत. यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, अलियाच्या यशामुळे ते खूप खुश आहेत.

महेश हे एका मुलाखतीत म्हणाले की, “आता अलियाला आमची गरज नाही. तिच्यामध्ये पुढे जाण्याची खूप क्षमता आहे. मी माझे घर चालवण्यासाठी अनेक सिनेमे तयार केले. परंतु आलियाने तिच्या कष्टाने स्वतः चे एक वेगळे स्थान बनवले आहे. तसेच ती खूप हुशार देखील आहे.”

पुढे ते म्हणाले की, “आलिया लहानपणी ५०० रुपयांसाठी आपल्या वडिलांच्या पायाला क्रीम लावात होती. परंतु तिने आज आपल्या चिकाटीने आणि मेहनतीने एवढे पैसे कमावले आहेत. जेवढे मी माझ्या 50 वर्षाच्या जीवनात कमावले नाहीत.

आलियाने नुकतेच तिचे प्रोडक्शन हाऊस पुढे जाण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. तिने आपल्या प्रोडक्शन हाऊसचे नाव इटर्नल सनशाईन प्रोडक्शन हाऊस ठेवले असून, आता ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या काही अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे.

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यावेळी ती फक्त 17 वर्षाची होती. त्यानंतर ‘हायवे’, ‘उडता पंजाब’ ‘कलंक’ यांसारख्या भरपूर चित्रपटात तिने काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. (alia bhatt had made more money than mahesh bhatt)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अंकिता लाेखंडेचा बाॅलिवूडबाबत माेठा खूलासा; म्हणाली, ‘माझा गॉडफादर…’

2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा